शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

साईभक्त पायी निघाला शिर्डीला

By admin | Updated: September 13, 2015 00:30 IST

‘तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, हे जगदाता साईबाबा, मी शिर्डीला पायी चालत येईन’, ...

तिसऱ्यांदा निघाला वारीवर : विजयादशमीला शिर्डीला पोहोचणार भंडारा : ‘तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, हे जगदाता साईबाबा, मी शिर्डीला पायी चालत येईन’, या भजनातील वाक्याप्रमाणे आणि साईबाबांवर निस्सिम भक्ती असलेल्या ओडिसा राज्यातील एका भक्ताने ओडिशा ते शिर्डी असा पायदळ प्रवास सुरू केला आहे. बिपत तारण दास (४५) रा. बोलोनी, जि.केवझर, ओडिशा असे या साईभक्ताचे नाव आहे. ओडिसावरून दोन हजार किमी लांब असलेल्या शिर्डीला जाण्यासाठी बिपत दास हा अनवानी पायाने निघाला आहे. १६ आॅगस्ट रोजी सुरू झालेला त्याचा पायी प्रवास अडीच महिन्यानंतर म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी शिर्डी येथे संपणार आहे. याच प्रवासादरम्यान, काल बिपत दास यांचे भंडारा शहरात आगमन झाले. त्यांचा मुक्काम तुकडोजी पुतळ्याजवळील हनुमान मंदिरात होता. डोक्यावर साईबाबांची पालखी घेऊन आलेल्या बिपतशी चर्चा केली असता साईभक्तीमागील पार्श्वभूमी सांगितली. आपण सधन कुटुंबातील असून मला जेव्हा साईबाबांचा साक्षात्कार होतो, तेव्हा मी अनवानी पायाने शिर्डीच्या प्रवासाला निघतो. सधन कुटुंबातील असल्याने वाहतुकीची अनेक साधने आहेत. तरीसुद्धा एकाही वाहनाचा उपयोग करीत नाही. यापुर्वी शिर्डीला दोनदा पायी गेलेलो असून ही तिसरी वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. ओडिसा ते शिर्डी या पायी प्रवासात तब्बल अडीच महिन्याचा कालावधी लागतो. दररोज ४० कि.मी. पायी प्रवासानंतर एखाद्या मंदिरात मुक्काम करणे. सकाळी पुन्हा पुढच्या प्रवासाला निघणे असा दिनक्रम आहे. एका लहान बॅगेत कपडे व अन्य सामान आहेत. मुक्कामी असताना कुणाचीही मदत न घेत स्वत:ची व्यवस्था स्वत:च करीत असल्याचे सांगितले. दि. ११ सप्टेंबर रोजी त्यांनी भंडाऱ्याहून शिर्डीसाठी प्रस्थान केले. प्रवासादरम्यान ठिकठिकाणी मुक्काम करीत दसऱ्याच्या दिवशी ते शिर्डीत पोहोचतील. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने डोक्यावर साईबाबांची पालखी घेऊन तो बोलोनी या मूळ गावाकडे रवाना होईल. परतताना गावोगावात साईबाबांचा प्रसाद वाटत जाणार असून हा प्रवाससुद्धा अडीच महिन्याचा असेल. सन २०१० मध्ये त्यांनी बोलोनी ते शिर्डी हा प्रवास असा रात्रंदिवस केला होता. त्यावेळी शिर्डी येथे पोहोचण्यासाठी एक महिना १६ दिवसांचा कालावधी लागल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)