शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक काळातील ‘शीलाप्रकस्थ’ आजही दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 22:36 IST

पवनी तालुक्यात प्राचीन, मध्ययुगीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, समाधी आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या दुर्लक्षित व उदासिन धोरणामुळे या ऐतिहासिक वास्तूंचा विकास झालेला नाही. परिणामी ही पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटक येत नाही. याचे उत्तम उदाहरण खैरी (तेलोता) व पिंपळगाव (नि) येथील शिलाप्रकस्थ (डोलमेंट्स) यांचे देता येईल.

ठळक मुद्देपुरातत्व विभाग लक्ष देईना : तर मिळू शकते पर्यटनाला चालना

चरणदास बावणे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : पवनी तालुक्यात प्राचीन, मध्ययुगीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, समाधी आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या दुर्लक्षित व उदासिन धोरणामुळे या ऐतिहासिक वास्तूंचा विकास झालेला नाही. परिणामी ही पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटक येत नाही. याचे उत्तम उदाहरण खैरी (तेलोता) व पिंपळगाव (नि) येथील शिलाप्रकस्थ (डोलमेंट्स) यांचे देता येईल.प्राचीन कालातील वैभवाची साक्ष देणारे वाकाटाक काळातील शीलाप्रकस्थ कोंढा गावापासून ७ ते ८ किमी अंतरावर खैरी (तेलोता) व पिंपळगाव नि. या गावात मिळतात. हे प्राचीन अवशेष ऊण, वारा, पाऊस याचा मार सहन करीत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. खैरी (तेलोता) येथील शिलाप्रकस्थ यामध्ये गावकरी जनावराचा चारा तणस भरुन ठेवतात. तसेच या ऐतिहासिक वास्तूला जनावरे बांधतात. यामुळे या ऐतिहासिक वास्तूला धोका निर्माण झाला आहे.शिलाप्रकस्थ ही एक समाधी आहे. महाराष्टÑाच्या प्राचीन इतिहासात वाकाटक घराणे इ. स. २७० ते इ.स. ५५० या काळात विदर्भात होऊन गेले. या घराण्याच्या राजधान्या प्रवरपूर (पवनार) नंदीवर्धन (नगरधन), वत्सगुलम (वाशिम) ह्या राहिल्या आहेत. वाकाटक राजा दुसरा ऋद्रसेन यास गुप्तसम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य याने आपली मुलगी प्रभावती गुप्ता दिली होती. असा प्राचीन इतिहास आहे. अशा समृध्द वाकाटक काळात मनुष्य मेल्यानंतर पुरले जात असे तेथे चुलीच्या आकाराचे ती मोठे दगड मांडून त्यावर भलेमोठे गोलाकर सपाट दगड ठेवण्याची प्रथा होती. त्याला शिलाप्रकस्थ म्हणत.इ.स. पूर्व १ हजार वर्षापुर्वी महापाषाण काळात देखील मृत्यूनंतर मृताच्या दैनंदिन व आवडीच्या वस्तू त्यासोबतच पुरल्या जात. त्याजागी त्याची स्मृती म्हणून एक मोठा दगड किंवा दगडाचा ढिग विशिष्ट पध्दतीने ठेवला जाई, असे अवशेष विदर्भात नागपूर जिह्यात माहूरझरी आणि भडारा जिल्हात खैरी (तेलोता), पिंपळगाव (नि) येथे प्रापत होतात. पुरातत्व विभागाने या शिलाप्रकस्थाला मंडप तयार करुन सुरक्षा भिंत करणे सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. हा ठेवा अनमोल आहे. हे जपणे आवश्यक आहे. पिंपळगाव (नि) येथे ग्रा.पं. ने शिलाप्रकस्थाला तारेचे कंपाऊंड तयार केले आहे. पण खैरी (तेलोता) येथे शिलाप्रकस्थ बोळी (तलाव) व शेतात हे उघड्यावर आहे. खैरी (तेलोता) येथे दोन शिलाप्रकस्थ आहेत एक बोलीत खुल्याजागेत आहेत येथे पावसाळ्यात पाणी साचले असते. बोळीचे पाणी आटल्यानंतर गावकरी शिलाप्रकस्थाला लागून तणसाचे ठीग ठेवतात. तसेच शिलाप्रकस्थामध्ये तणस भरुन ठवेतात. त्यास जनावरे बांधतात. दुसरा शिलाप्रकस्थ बोळीला लागून श्ोतात आहे. येथे चुलीचे तीन भव्य दगड आहेत. त्यावरील मोठा गोल दगड सध्या नाही. यासंबंधी गावकºयांना विचारले असता खुप वर्षापासून वरचे दगड नसल्याचे सांगितले. तीन दगडातून सध्या कडूनिंबाचे झाड उभे आहे. दुरदुरचे पर्यटक यांना पाहण्यासाठी येतात. पण त्यांचे देखभाल नसल्याने नाराजी व्यक्त करतात.पवनी तालुक्यात पर्यटन स्थळात सिंदपूरीचा महासमाधी स्तूप, गोसे प्रकल्प आणि पवनी शहर आणि खैरी (तेलोता), पिंपळगाव नि. येथील शिलाप्रकस्थ हे दोन ठिकाणे यांचा समावेश होऊ शकते. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक आहे. पवनी शहराच्या बाबतीत माहिती प्रसिध्द होणे आश्यक आहे. हे नगर प्राचीन आहे. तसेच एक वैभवशाली नगर म्हणून मौर्य, सातवाहन, वाकाटक, शुंग, चालुक्य, राष्टÑकुट व मध्ययुगीन यादवकाळात प्रसिध्द शहर होते. येथे अनेकदा पुरातत्व विभागाने उत्खनन केले. त्यामध्ये नाणे, मातीची भांडी, बौध्द स्तूप आढळून आले आहे. सम्राट अशोक काळातील स्तंभ आजही पवनी शहरात आहेत. पवनी शहराला तसेच खैरी (तेलोता) व पिंपळगाव (नि.) येथील डोलमेंट्सला दोन हजार वर्षाचा इतिहास आहे. पवनी हे प्राचीन मंदिरे व बौध्द विहारासाठी प्राचीन काळापासून प्रसिध्द होते हे नगर मातीच्या परकोटने चारही बाजूने वेढलेली असून त्या परकोटास चार द्वार आणि आठ खिडकीवजा मार्ग आहेत. सध्या एकच द्वार सध्यास्थितीत आहे. या द्वारातून पवनी नगरीत प्रवेश करता येते. मातीच्या परकोटामुळे सभोवताली तळी, सरोवरे निर्माण झाली आहेत. त्यापैकी, कुºहाडा, बालसमुद्र, भाई तलाव उपलब्ध आहेत. वैनगंगा नदीच्या तीरावर दक्षीणेस ही नगरी आहे. येथे पायºयाचे घाट आहेत. तलाव, नदी यामध्ये पर्यटनास भरपूर वाव आहे. येथे बोटींगची सोय केल्यास पर्यटन पुन्हा वाढू शकते. मंदिरात मुरलीधर मंदिर, वैजेश्वर, राममंदिर, भुतेश्वर, पंचमुखी गणपती, पंचमुखी मारोती मंदिर व नागठाणी भरपुर आहेत. मुरलीधर मंदिराच्या शिखरावर सुवर्णचक्र उभारले आहे. जगन्नाथ टेकडीवर केलेल्या उत्खन्नात बौध्दकाळातील स्तंभ शिलालेख, स्तुप यांचे अवशेष मिळाले आहेत. त्यामुळे दूरदूरचे पर्यटक जगन्नाथ टेकडीला भेट देण्यास येत असतात. पुरातत्व विभागाने पवनी शहर व खैरी (तेलोता), पिंपळगाव (नि) डॉलमेंट्सना संरक्षित स्थळ म्हणून घोषित करणे आवश्यक आहे.पर्यटन बस सुरु करणे आवश्यकपवनी तालुक्यातील पवनी, खैरी (तेलोता) पिपंळगाव (नि), अड्याळ, चकारा, गोसे (प्रकल्प), सिंदपूरी महासमाधी स्थळ या पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा या स्थळांना भेट देणारी पर्यटन बस एस.टी. महामंडळाने सुरु करणे आवश्यक आहे. त्यामुळे गावकरी व पर्यटक यांना बसची सुविधा मिळेल. पवनी तालुक्यातील सर्वात दुर्लक्षीत स्थळे खैरी (तेलोता) पिपंळगाव (नि) येथील शिलाप्रकस्थ आहेत. यांना सभा मंडप तयार करुन सुरक्षाभिंत बांधणे आवश्यक आहे. पण पुरातन विभाग लक्ष देत नाही. तरी ऐतिहासिक दुर्लक्षित वास्तूचे संरक्षण करण्याची मागणी इतिहासप्रेमी पर्यटकप्रेमी लोकांनी केली आहे. तालुक्यातील अड्याळ हे देखील प्राचीन गाव आहे. येथे गावाच्या मध्यभागी हनुमानाची ९ फूट उंचीची मुर्ती आहे. ही मूर्ती प्राचीन वाकाटक काळातील असावी असा अंदाज आहे. सध्या अड्याळचे हनुमान मंदिर भव्य, सुंदर कलाकृती यांनी आकर्षक तयार केले आहे. तसेच अड्याळ जवळील निसर्गरम्य चकारा येथे प्राचीन महादेव मंदिर आहे. तसेच टेकडीवर बौध्द धर्मियांनी साधना केंद्र निर्माण केले आहे.पुरातन विभागाचे अधिकारी खैरी (तेलोता) येथे एकदा आले होते. त्यांनी सभामंडप व सुरक्षाभिंत बांधणार असल्याचे सांगितले. पण नंतर दोन तीन वर्षापासून ते आले नाहीत.- राजकुमार बावणेनागरिक रा. खैरी (तेलोता)