शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वृद्धासाठी मासेमार बांधव ठरले ‘देवदूत’

By admin | Updated: July 6, 2017 00:31 IST

‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण वैनगंगा नदीच्या छोट्या पुलावरून नदीपात्रात पडलेल्या इसमाबाबत घडली.

कारधा नदी पात्रातील प्रकरण : भंडारा शहर पोलिसांनी फिरविली घटनास्थळाकडे पाठप्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण वैनगंगा नदीच्या छोट्या पुलावरून नदीपात्रात पडलेल्या इसमाबाबत घडली. या वृद्धाला नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या बांधवांनी वाचविल्याची घटना मंगळवारला घडली. अडकोबा गाढवे (७५) रा.कोलारी असे त्या वृद्धाचे नाव आहे. सदर गृहस्थ हा कारधा नदीच्या लहान पुलावरून पायदळ जात होता. अचानक कुणाला कळायच्या आत ते नदीपात्रात पडले. कुणी म्हणतात, त्यांनी उडी घेतली तर कुणी म्हणतात, भोवळ आल्याने ते पडले. मात्र समयसूचकता दाखवून मासेमारी करणाऱ्या दोन इसमांनी त्यांचे प्राण वाचविले. आसाराम शेंडे व उमेश शेंडे असे या वृद्धाचे प्राण वाचविणाऱ्या या मासेमाऱ्यांचे नाव आहे. हे दोघेही कारधा येथील रहिवासी आहेत. नेहमीप्रमाणे आसाराम व उमेश हे मंगळवारला दुपारच्या सुमारास छोट्याशा डोंगीतून वैनगंगा नदीच्या पात्रात मासेमारी करीत होते. यावेळी लहान पुलावरून जोरजोराने ओरडण्याचा आवाज त्यांनी ऐकला. पुलाच्या दुसऱ्या बाजूला असल्यामुळे त्यांना काहीही दिसले नाही. त्यामुळे वृद्ध पडलेल्या बाजूने त्यांनी डोंगी टाकली. यावेळी पाण्याचा प्रवाह असल्याने त्यात एक वृद्ध वाहून जाताना त्यांना दिसला. या दोघांनीही जीवाची पर्वा न करता वृद्धाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यात ते यशस्वीही झाले. त्यांनी वृद्धाला पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान पुलावर बघ्यांची गर्दी झाली होती. यातीलच कुणीतरी कारधा पोलिसांना माहिती दिल्याने पोलिसही घटनास्थळी पोहचले होते. पोलिसांना वृद्धाच्या खिशात रूग्णालयाची चिठ्ठी, ५० रूपये व निवडणूक ओळखपत्र मिळाले. यावरून अडकोबा गाढवे यांची ओळख पटली. या नदीपात्रात मासेमार बांधवांनी आतापर्यंत अनेकांना जीवनदान दिले आहे. अनेकांचे मृतदेह काढून त्यांच्या कुटुंबियांच्या सुपूर्दही केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे पोलीस प्रशासनाची होणारी धावपळ थांबली. दरम्यान याबाबत कारधा पोलिसांना विचारले असता, आडकोबा यांना पोटाचा त्रास असल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. भंडारा पोलिसांचे दुर्लक्षघटनास्थळ भंडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे घटनास्थळावर पोहचलेल्या कारधा पोलिसांनी याची माहिती भंडारा पोलिसांना वारंवार दिली. या प्रकरणाचे गांभीर्य असतानाही भंडारा शहर ठाण्यातून कुठलेही पोलीस कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नाही. याबाबत कारधा पोलिसांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याचीही माहिती समोर आली आहे.धोतरामुळे वाचला ‘अडकोबा’चा जीव अडकोबा यांनी अंगात धोतर घातला होता. नदीपात्रात ते पडल्यानंतर हवेच्या दाबाने अंगातील धोतर फुलला. त्यामुळे ते नदीपात्रात खोलवर न जाता धोतरामधील हवेच्या दाबामुळे ते पाण्यावर तरंगत राहिले. कदाचित त्यांनी पँट परिधान केलेला असता तर ते लागलीच तळाला गेले असते. आडकोबा यांचा जीव वाचण्यात धोतर महत्त्वपूर्ण ठरला आहे.