शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

बालकावर धारदार शस्त्राने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 22:59 IST

घराशेजारी भाड्याने राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका तरुणाने ११ वर्षीय बालकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास येथील गोवर्धन नगरात घडली. गंभीर जखमी बालकावर भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ठळक मुद्देतुमसरची घटना : हल्लेखोर तरुण उत्तर प्रदेशातील

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : घराशेजारी भाड्याने राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका तरुणाने ११ वर्षीय बालकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास येथील गोवर्धन नगरात घडली. गंभीर जखमी बालकावर भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अमन सैय्यद (११) रा.गोवर्धन नगर तुमसर असे जखमी बालकाचे नाव आहे. त्याच्यावर शेजारी राहणाऱ्या सोहिल रायनी रा.उत्तर प्रदेश याने धारदार शस्त्राने हल्ला केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले हल्ला नेमका कोणत्या कारणासाठी केला हे मात्र कळू शकले नाही. मुळचा उत्तर प्रदेशातील सोहिल हा तुमसर शहरात पीओपीचे काम करतो. बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कोणतेही कारण नसताना त्याने अमनवर धारधार शस्त्राने वार केले. त्याच्या हातावर वार होताच तो जोराने ओरडला. त्यानंतर हनुवटीवरही वार करण्यात आले. या मुळे अमन रक्ताच्या थारोळ्यात कोसळून बेशुद्ध झाला. तर सोहिलने तेथून पळ काढला. तात्काळ तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात जखमी अमनला दाखल करण्यात आले. त्यानंतर भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. तसेच सोहिलला ताब्यात घेतले.