शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

तुमसरातही ‘शेप’ने अनेकांना गंडविले

By admin | Updated: September 18, 2016 00:33 IST

आर्थिकस्तर उंचविण्याचे स्वप्न दाखवत शेप महाबचतगटाच्या माध्यमातून कोट्यवधीच्या ठेवी घेऊन मोरेश्वर मेश्राम याने अपहार करून अनेकांना गंडविले,...

सीआयडी चौकशीची मागणी : अडीच कोटींचा अपहारतुमसर : आर्थिकस्तर उंचविण्याचे स्वप्न दाखवत शेप महाबचतगटाच्या माध्यमातून कोट्यवधीच्या ठेवी घेऊन मोरेश्वर मेश्राम याने अपहार करून अनेकांना गंडविले, अशा आशयाची तक्रार तुमसर व गोबरवाही पोलीस ठाण्यात ओमप्रकाश गोंडाणे रा.तुमसर यांच्यासह ४१ जणांनी केली आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.गोंडाणे हा शेप महाबचतगटाच्या तुमसर शाखेत प्रभारी संयोजक पदावर मानधनावर कार्यरत होता. अभिनय अभिरूची कला व बहुउद्देशिय संस्था गडचिरोली स्थापना मोरेश्वर मेश्राम यांने ११ जण मिळून ही संस्था २५ मार्च १९९८ रोजी स्थापन केली. त्यात मोरेश्वर रामाजी मेश्राम भंडारा, गौतम वरकडे, नंदलाल अंबादे, किरपाल सयाम, लता इंदुरकर, रमेश माहुर्ले, महेंद्र ठाकरे, सुनिल नंदमिरावार, विवेक मगर, सुनंदा मडावी, समिना सय्यद, रा.गडचिरोली यांचा समावेश आहे. या संस्थेच्या माध्यमातून शेप महाबचत गट तयार करून तो भंडारा गोंदिया, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यात सुरू करण्यात आला. विविध तालुक्यात गटात संयोजक, शाखा प्रभारी, संपर्क अधिकारी सांखीकी अधिकारी व इतर कर्मचारीची साखळी निर्माण करून त्याच्यामार्फत त्या-त्या क्षेत्रातून खातेदाराकडून दरमहा ६० रूपये ते ४९९ रूपये व ५०० रूपये ते १० हजार रूपये पर्यंत सावधी ठेवी जमा करीत होते. त्याचप्रमाणे साडेपाच वर्षात दामदुप्पट योजना, सावधी ठेवीवर साडे तीन वर्षात दामदुप्पट लाभ आदी प्रलोभने दाखवून तुमसर तालुक्यातील खातेदाराकडून २ कोटी ४९ लक्ष ६४ हजार ७९१ रूपये जमा केले ती रक्कम शेप महाबचत गटाचे मुख्य प्रवर्तक मोरेश्वर मेश्राम यांच्या खात्यात जमा केली जात होती. जमा झालेला पैसा मोरेश्वर मेश्राम हे प्रज्ञा मेश्राम मुलगी प्राजक्त मेश्राम, प्रणोती मेश्राम, मुलगा पियुश व राहुल खंडार यांची नावे व्यावसायीक कंपन्या स्थापन करून गुंतविले. तेथून मिळणाऱ्या नफयाच्या माध्यमातून ठेविदारांचे पैसे लाभासह परत होणार असल्याचे सांगितले. या पैशातून गणेशपूर, धारगाव, आलेसूर, खैरी, घानोड, झाडगाव याठिकाणी मालमत्ता विकत घेतली. ठेवींची मुदत संपल्यानंतर खातेदारांनी पैसे मागितले असता फरार झाले. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून खातेदारांचे पैसे मिळवून देण्याची मागणी तक्रारकर्त्या ४२ जणांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)