युवराज गोमासे ल्ल करडीझाडीपट्टी पूर्व विदर्भाची आण बान शाल तर नाट्य कंपन्यांची खाण म्हणून ओळखली जाते. झाडीपट्टीत गणेशोत्सवापासून नाटकांना सुरूवात होते. मात्र दिपोत्सवापासून मंडई निमित्ताने नाटकांना खऱ्या अर्थाने सुरूवात होते. सध्या झाडीपट्टीमध्ये नाटकांची चाहूल आहे. गावागावांमध्ये नाटकांच्या तालमीला सुरूवात झाली आहे. नाट्य कंपन्यांमध्ये रंगत चढू लागली आहे.झाडीपट्टीमध्ये दिवाळीच्या निमित्ताने गावागावात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. मंडईच्या निमित्ताने दूरकर राहणारे मित्र मंडळी, नातेवाईक व आप्तस्वकीय गावात येतात. मंडई उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. मनोरंजनाबरोबर समाजप्रबोधनही या माध्यमातून होत असते. झाडीपट्टी रंगभूमी पूर्व विदर्भात झाडीवूड या नावाने सुद्धा ओळखली जाते.भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये नाट्य क्षेत्राला झाडीपट्टी म्हणून संबोधले जाते. झाडीपट्टीमध्ये विविध नाटक कंपन्या कार्यरत असून यामध्ये जिल्ह्यातील सरगम, चंद्रकला थिएटर्स, लोकजागृती रंगभूमी, धनंजय स्मृती, प्रशांत स्मृती या सारख्या कंपन्या प्रसिद्ध आहेत. सदर कंपन्यांची रंगीत तालीम सुरू होवून, सरावासाठी झाडीपट्टीतील नावाजलेले कलावंत दाखल झाल्याचे दिसून येत आहे. गावा गावात हौशी नाट्य कलाकार सुद्धा तालीम सरावात व्यस्त झालेले असून जोश चढत चालला आहे. झाडीपट्टीत भावगीत, प्रेमगीत, चरित्र अभिनय, हास्य अभिनय, स्त्रिपात्र अशा विविध भूमिकांमध्ये अभिनय करण्यासाठी मुंबई, पूणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आदी शहरातून नावाजलेले कलावंत येत असतात. महिला कलाकार, नृत्यांगणा व तरूणी सुद्धा हजेरी लावताना दिसतात. झाडीपट्टीत नाटकांना खरा रंग चढणार तो दिवाळीच्या पर्वावर झाडीपट्टीतील गावागावात मंडईचा उत्सव भरतो. त्यानिमित्ताने गावातील हौशी कलावंतांकडून नाटकांचे आयोजन करण्यात येत असते. नाट्य कंपन्यांची नाटके सुद्धा आयोजित केली जातात. त्यामुळे झाडीपट्टीतील ग्रामीण भागात उत्सवांचा माहोल सगळीकडे पहावयास मिळत असतो.
झाडीपट्टी हौशी रंगभूमीला मंडई, नाटकांची चाहुल
By admin | Updated: October 7, 2015 01:55 IST