शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शाहू महाराजांचे कार्य अनुकरणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 22:45 IST

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दलित, मागासवगीर्यांच्या उत्थानासाठी सदैव कार्य केले. आरक्षणाची गरज त्याकाळात ओळखून त्यांनी आरक्षण लागू केले. महाराजांनी केवळ समाजसुधारकच नाही तर अन्य क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे. शाहू महाराजांचे कार्य आजही अनुकरणीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जडण घडणीत राजर्षी शाहू महाराजांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.

ठळक मुद्देमधुकर कुकडे : सामाजिक न्याय दिन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दलित, मागासवगीर्यांच्या उत्थानासाठी सदैव कार्य केले. आरक्षणाची गरज त्याकाळात ओळखून त्यांनी आरक्षण लागू केले. महाराजांनी केवळ समाजसुधारकच नाही तर अन्य क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे. शाहू महाराजांचे कार्य आजही अनुकरणीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जडण घडणीत राजर्षी शाहू महाराजांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस २६ जनू हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन भंडारा येथे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षीय उदघाटनपर भाषणात खा. कुकडे बोलत होते. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे होते तर ा्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, कावेरी नाखले, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे, डॉ. रविंद्र वानखेडे, बाळा गभण उपस्थित होते. जातपात, धर्म, वंश विसरुन समाज संघटित राहीला पाहिजे तर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ आपणास घेता येईल. हाच खरा सामाजिक न्यायाचा उद्देश आहे असे खासदार कुकडे म्हणाले. आपण कुठल्याही जाती पंथाचे नसून सर्व प्रथम भारतीय आहोत, अशी भावना जागृत झाली पाहीजे. त्यासाठी समाज उत्थानाचे कार्य करा, असेही ते म्हणाले.सामाजिक समतेचे जनक, सर्व प्रथम आर्थिक व सामाजिक समता प्रस्थापित करणारे महापुरुष म्हणजे राज्यर्षी छत्रपती शाहू महाराज, असे उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे म्हणाले.अमृत बन्सोड म्हणाले, सामाजिक न्यायाची संकल्पना महात्मा फुले यांनी मांडली. त्यास मूर्तरुप राजर्षी शाहू महाराजांनी दिले. सर्व प्रथम आपल्या संस्थानात विद्यार्थ्यांकरीता वसतीगृहाची स्थापना शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे केली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात मदत झाली. मागासवगीर्यांना ५० टक्के आरक्षण आपल्या संस्थानात लागू केले. अस्पृश्यता नष्ट करुन समता प्रस्थापित केली, असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. रविंद्र वानखेडे, बाळा गभणे यांची भाषणे झाली.सामाजिक न्याय दिनानिमित्त जिल्हयातील दादासाहेब गायकवाड पुरस्कार प्राप्त मिरा भट, समाज भूषण पुरस्कार प्राप्त विनोद मेश्राम, दलित मित्र अमृत बन्सोड, ज्ञानेश्वर खंडारे, इश्वर सोनवाने, बाळकृष्ण शेंडे व ब्ल्यु डायमंड सोशल वेल्फेअर इंस्टीटयुट, मोहाडी या समाजभूषण प्राप्त संस्थेचा सत्कार करण्यात आला. शासकीय वसतीगृहातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप अतिथींच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांनी तर आभार मुख्याध्यापक मेंढे यांनी मानले. सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी समता दिंडीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी सहाय्यक आयुक्त आशा कवाडे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय झिंगरे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते उपस्थित होते. ही दिंडी शिवाजी स्टेडियमपासून निघून सामाजिक न्याय भवनात समारोप झाला.