शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धानपीक किडींच्या सावटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

लाखनी तालुक्याच्या चुलबंद नदीखोऱ्यात उन्हाळी धानासह भाजीपाल्याची मोठी शेती केली जाते. खरीपात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिकांची लागवड केली. लाखनी तालुक्यात १९७२ हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली असून त्यात पालांदूर कृषी मंडळात ९८२ हेक्टर धानाचा समावेश आहे. तसेच भेंडी, कारले, टमाटर, वांगे आदी मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली.

ठळक मुद्देहवामानाचा परिणाम : करपा आणि खोडकिडींचा प्रादुर्भाव

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : सर्वत्र कोरोनाचे संकट घोंगावत असताना आता शेतशिवारातील धानपिकासह भाजीपाल्यावर किडींनी आक्रमण केले आहे. प्रत्येक शेतात करपा, खोडकिडींचा प्रादूर्भाव वाढला असून नियंत्रणासाठी मजूरही मिळतही नाही. बदलत्या वातावरणाचा हा फटका असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे.लाखनी तालुक्याच्या चुलबंद नदीखोऱ्यात उन्हाळी धानासह भाजीपाल्याची मोठी शेती केली जाते. खरीपात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिकांची लागवड केली. लाखनी तालुक्यात १९७२ हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली असून त्यात पालांदूर कृषी मंडळात ९८२ हेक्टर धानाचा समावेश आहे. तसेच भेंडी, कारले, टमाटर, वांगे आदी मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. दिवाळीपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. पाऊस आणि गारपीटीने भाजीपाला पीक उद्ध्वस्त झाले आहे. विषम वातावरणामुळे धानावर करपा आणि खोडकिडीचा प्रादूर्भाव दिसत आहे. तर भाजीपाला पिकांवर विविध किडींनी आक्रमण केले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना शेतकरी धास्तावले असताना आता किडींचा बंदोबस्त कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या धानाचे पीक अंतिम टप्प्यात असून काही गर्भावस्थेत तर काही निसव्यावर आहेत. आता ढगाळी वातावरणाने या किडींचा प्रादूर्भावात वाढ होत आहे.खोडकिडी, करपा, पर्णकोष करपा, मानमोडी आदी रोगांचा प्रादूर्भाव शेतात दिसून येत आहे. लोंब्या पांढऱ्या पडत आहे. प्रत्यक्ष बांधीमध्ये उतरून पाहणी करावी. त्यासाठी योग्य उपाययोजना केल्यास उत्पादनात होणारी घट टाळता येऊ शकते.-पद्माकर गिदमारे, तालुका कृषी अधिकारी, लाखनी.

टॅग्स :agricultureशेती