शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीमुळे गावागावांतील मजुरांना सुगीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 22:05 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आगामी दोन दिवसात वेग येणार आहे. गेल्या आठवड्याभरापासून निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले आहे. उमेदवारांच्या प्रचारसभेत गर्दी जमविण्यापासून तर प्रचार साहित्य वाटपासाठी कार्यकर्ते म्हणून महिला व पुरुषांना बोलविले जाणार असल्याने आगामी ८-१० दिवस हजारो नागरिकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.

ठळक मुद्देव्यावसायिकांची चांदी : गर्दी वाढविण्यासाठी महिलांनाही मिळणार मजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आगामी दोन दिवसात वेग येणार आहे. गेल्या आठवड्याभरापासून निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले आहे. उमेदवारांच्या प्रचारसभेत गर्दी जमविण्यापासून तर प्रचार साहित्य वाटपासाठी कार्यकर्ते म्हणून महिला व पुरुषांना बोलविले जाणार असल्याने आगामी ८-१० दिवस हजारो नागरिकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.भंडारा - गोंदिया लोकसभा क्षेत्रासाठी पहिल्या टप्पा ११ एप्रिलला मतदान होणार आहे. प्रमुख राजकीय पक्षांसह इतरही पक्षातील उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहे. निवडणूक प्रचारासाठी आपापल्या पक्षातील मोठे नेते, स्टार प्रचारक आदींचे बॅनर बनवून प्रचार कार्यालयाच्या आसपास लावण्यात आले आहेत. त्यासाठी लागणारे विविध प्रचार साहित्य बनविणाऱ्या कारागिरांना यामुळे काही दिवसांसाठी का होईना, चांगले दिवस आले आहेत. शिवाय ग्राफीक्स, प्रिंटिंग प्रेस, डेकोरेशन, वाहने आदीसह विविध साहित्य निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणार असल्याने या व्यावसायीकांची सध्या चांदी आहे. ऐवढेच नाही तरनामांकन रॅलीसाठी हजारो कार्यकर्ते व नागरिकांना भंडारात आणण्यात आले होते. यासाठी प्रमुख दोन्ही पक्षांना शेकडो वाहनांची व्यवस्था करावी लागली. ठिकठिकाणच्या प्रचार सभांसाठी अशा पद्धतीने वाहने, बॅनरची गरज भासणार आहे. निवडणुकीच्या निमित्ताने खासगी वाहतूक करणाऱ्या व्यावसायीकांना सुगीचे दिवस आले आहेत.जिल्ह्यासह तालुकास्तरावरही प्रमुख राजकीय पक्षाच्यावतीने मिनी प्रचार कार्यालय सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे तालुकास्तरावरील डेकोरेशन व्यावसायीकांचा धंदा आता वाढला आहे. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने जिल्हा व तालुका मुख्यालयी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी होत असल्याने हॉटेल तसेच भोजनालय चालविणाऱ्यांचा व्यवसाय वाढला आहे. याशिवाय प्रचार कार्यालय परिसरातील चहा व्यावसायिकांनाही फुरसत मिळत नसल्याचे चित्र आहे. १ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या प्रचारासाठी महिलांनाही बोलविण्यात येणार असल्याने या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.रोहयो व इतर कामांवर परिणामग्रामीण भागातील बहुतांश पुरुष व महिला रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणारे नोंदणीकृत मजूर आहेत.गेल्या महिनाभरापासून हे मजूर रोजगार हमी योजनेच्या कामावर जात आहेत. मात्र आता निवडणूक प्रचारासाठी प्रमुख राजकीय पक्षाला सर्वसामान्य नागरिकांसह मजुरांचीही गरज भासणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या जिल्हा व तालुकास्तरावर प्रचारसभा होणार आहेत. या प्रचारसभेत कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठी गर्दी उमेदवार तसेच पक्षश्रेष्ठींना अपेक्षित असते. त्यामुळे राजकीय पक्षातर्फे गर्दी जमविण्यासाठी महिलांना सभास्थळी बोलविले जाते. सभेला गर्दी करण्यासाठी येणाºया महिलांना प्रतिदिवस मजुरी म्हणून २०० रुपये दिले जातात. प्रचारकार्यात बहुतांश मजूर व्यस्त राहत असल्याने रोजगार हमी व इतर बांधकामावर मजूर जात नाही. परिणामी रोहयो तसेच इतर इमारत बांधकामे निवडणूक काळात प्रभावित होणार आहेत.