शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेच्या रोहा घाटावर सात रेती तस्करांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:49 IST

तालुक्यातील वैनगंगा नदीच्या रोहा घाटावर अवैध साठवून ठेवलेल्या रेतीची वाहतूक करणाऱ्या सात तस्करांना जिल्हा खनीकर्म विभाग व पोलिसांच्या पथकाने रंगेहात अटक केली. त्यांच्या जवळून १२ लाख ३४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसहा ट्रक जप्त : १२ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यातील वैनगंगा नदीच्या रोहा घाटावर अवैध साठवून ठेवलेल्या रेतीची वाहतूक करणाऱ्या सात तस्करांना जिल्हा खनीकर्म विभाग व पोलिसांच्या पथकाने रंगेहात अटक केली. त्यांच्या जवळून १२ लाख ३४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बहुतांश ट्रक चालक अमरावती जिल्ह्यातील असल्याचे कारवाईत दिसून आले.भंडारा जिल्ह्यात रेती तस्करीला अलिकडे मोठे उधाण आले आहे. प्रत्येक घाटावर रेतीचे अवैध उत्खनन सुरु आहे. अशातच मोहाडी तालुक्यातील रोहा येथील वैनगंगा नदीघाटावर जिल्हा खनीकर्म अधिकारी आणि पोलिसांच्या पथकाने धाड मारली. त्यावेळी वैनगंगा नदीतील रेती चोरून स्मशानभूमीजवळ साठा केल्याचे दिसून आले. या साठ्यातील रेती जेसीबीच्या सहाय्याने ट्रकमध्ये भरली जात होती. या कारवाईत शाहाजाद सुलतान खान (३७) रा.वली चौक अमरावती, कलीम नसीम खान (४८) रा.पठाण चौक अमरावती, उज्ज्वल सदाशिव मेश्राम (४०) रा.बडनेरा (अमरावती), अशफाक मिसार शेख (२५) रा.मुजफ्फर पुरा अमरावती, फारूक हसन सैय्यद (२९) नवसारी (अमरावती), फारुख सत्तार खान (२२) रा.गणेशगंज जिल्हा शिवणी या ट्रकचालकांसह जेसीबीचालक प्रशांत कुंडलीक पटले (२३) रा.घोटमुंढरी जि.नागपूर यांना ताब्यात घेतले.त्यांच्या जवळून २४५ ब्रास रेती किंमत ७ लाख ३५ हजार रुपये जप्त करण्यात आली. सदर वाहने भंडारा पोलीस मुख्यालयात ठेवण्यात आली आहेत. ही कारवाई जिल्हा खनीकर्म अधिकाऱ्यांचे पथक, राखीव पोलीस दल, मोहाडी तहसीलचे भरारी पथक, मोहाडीचे ठाणेदार शिवाजी कदम, पोलीस शिपाई विनोद सेलोकर, पवन राऊत, मिताराम मेश्राम यांनी केली.मुंढरी घाटावर तस्करी जोमातवैनगंगा नदीच्या अलिकडच्या तिरावर रोहा घाट तर पैलतिरावर मुंढरी घाट आहे. विशेष म्हणजे पैलतिरावरील भागात मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे करून ठेवले आहेत. शेकडो ब्रास रेती शेतामध्ये आहे. यात डंपींग केलेल्या रेतीची रात्रीच्या वेळी वाहतूक केली जाते. नागपूरसह विदर्भात ही रेती पाठविली जात आहे. या घाटावर अद्यापर्यंत कुणीही कारवाई केली नाही. तस्करी करणाºया वाहनांच्या दररोज रांगा दिसत आहे. अशीच अवस्था कन्हाळगाव व ढिवरवाडा घाटावरही आहे.

टॅग्स :sandवाळू