शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सात लाखांची देशी दारु जप्त

By admin | Updated: October 7, 2016 00:47 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारू, अवैध देशी, विदेशी दारूविरोधात केलेल्या कारवाईत

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : दोन पीकअप वाहने जप्तभंडारा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारू, अवैध देशी, विदेशी दारूविरोधात केलेल्या कारवाईत ७ लाख २० हजार रूपयांच्या ९० मिलीच्या बाटलांच्या ३०० पेट्या जप्त केल्या. याप्रकरणी आरोपी वाहन चालकमालक शाबीर अली सय्यद, आनंद रामदास उमरीकर व सय्यद अजरुद्दीन यांच्याकडून १० लाख ७५ हजार किमतीच्या २ महेंद्र बोलेरो, ११ हजार किमतीचे तीन मोबाईल असे १८ लाख ६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी या तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६५ ए (ई) व ८१, ८३ अन्वये गुन्हा नोंदविला असून ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांनी केली.राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे पवनी तालुक्यातील खैरी दिवान गावाच्या चौरस्त्यावर लाखांदूर ते पवनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवैध देशी दारूचा साठा वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच निरीक्षक एस.एम. राऊत, दुय्यम निरीक्षक आर.आर. उरकुडे यांनी चमूसह खैरी दिवान येथे पाळत ठेऊन वाहनांची तपासणी केली. यात एम.एच. ३६/एफ ३१२५ व एम.एच. ३६ / एफ ३४९६ या दोन पिकअप वाहनाना थांबविण्यात आले. या वाहनात देशी दारूचा अवैध साठा सापडल्यामुळे वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात देशी दारूचा साठा चंद्रपूर जिल्ह्यात जात असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.जिल्ह्यातून हातभट्टी दारू, अवैध देशी, विदेशी दारू व परराज्यातून या जिल्ह्यात येणाऱ्या अवैध दारूचे उच्चाटन करण्याकरिता या विभागाने धाडसत्र सुरू केले आहे. त्यामुळे आपल्या परिसरात अवैध दारूबाबत काही गुन्हा घडत असेल तर त्यांनी याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे करण्याचे सांगून माहिती देणाऱ्यांचे नाव गोपणीय ठेवण्यात येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांनी केले.या कारवाईत निरीक्षक एम.एम. राऊत, आर.आर. उरकुडे व जवान एस.डब्लू. कोवे, जी.एस. सिंदपुरे, व्ही.एन. हरिणखेडे, व्ही.जे. माटे सहभागी होते. (नगर प्रतिनिधी)