शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जूनपासून होणार जिल्ह्यातील सात लक्ष जनावरांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:36 IST

विशेष म्हणजे सहा महिन्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात जनावरांचे लसीकरण पार पडले होते. भंडारा जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यात ...

विशेष म्हणजे सहा महिन्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात जनावरांचे लसीकरण पार पडले होते. भंडारा जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यात गाय वर्ग श्रेणीतील पशुधनाची संख्या २ लक्ष ३८ हजार ६७४ इतकी असून, त्यानंतर कुक्कुटवर्गीय पशुधनाची संख्या २ लक्ष ७० हजार २५९ इतकी आहे. जिल्ह्यात ९० हजार १६१ एवढ्या म्हशींची संख्या आहे. पावसाळ्यानंतर दरवर्षी जनावरांना विविध आजाराची लागण होत असते. लाळ्याखुरयुक्त हा विषाणूजन्य आजार असून, या रोगाच्या प्रादुर्भावामुळे जनावरे बाधित होण्याचे प्रमाण ९० ते ९५ टक्के असते. त्यामुळे पशुधनाचे नुकसान टाळण्यासाठी सर्व पशुधनाला लसीकरण केले जाते. हे लसीकरण दरवर्षी करण्यात येते. यापूर्वी गत नोव्हेंबर महिन्यात लसीकरण ही मोहीम हाती घेण्यात आली होती. यात कोरोना संकट काळातही कमी कर्मचारी असतानाही जनावरांना लसीकरणाची मोठी जबाबदारी पार पाडण्यात आली होती. लसीकरणांतर्गत दरवर्षी पशुवैद्यकीय दवाखान्यातर्फे लहान जनावरांना दवाखान्यात व मोठ्या जनावरांना पशुपालकांच्या घरी जाऊन ही लस देण्यात येते. पीपीआर लस शेळ्यांना दर तीन वर्षांनी तर इतर सर्व लसीकरण दर सहा महिन्याच्या कालावधीत करावे लागते. कमी कर्मचारीसंख्या असतानाही लसीकरण ९० टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण करण्यात आले होते. विशेष म्हणजे गत सहा वर्षांत भंडारा जिल्ह्यात कोणत्याही साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये दिसून आला नाही, ही येथे उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल.

बॉक्स

लाळ्याखुरकत हा विषाणूजन्य आजार आहे. यामुळे जनावरे बाधित होण्याचे प्रमाण ९० ते ९५ टक्के असते. पशुधनाचे नुकसान टाळण्यासाठी पशुपालकांनी ठराविक वेळेत लसीकरण करून सहकार्य करावे.

डॉ. नरेश कापगते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प. भंडारा

बॉक्स

पशुपालक म्हणतात...

दरवर्षी सहा महिन्यानंतर आम्ही पशुधनाला लसीकरण करीत असतो. विशेषतः तोंडखुरी व एकटांग्या व घटसर्प आजार जनावरांमध्ये पाहायला मिळतो. मात्र योग्य वेळी लसीकरण झाले तर जनावरांना रोगाची लागण होत नाही .

- बळीराम कुटे, पशुपालक भंडारा

नोव्हेंबर महिन्यात माझ्याकडील पशुधनाला लसीकरण केले होते. त्यामुळे कुठल्याही आजाराची लक्षणे जनावरांमध्ये आढळून आली नाही. आता १ जूनपासून लसीकरण होणार आहे. पशुसंवर्धन विभागाचेही सहकार्य लाभत आहे.

- एकनाथ दखणे, पशुपालक भंडारा