शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सेतू अभ्यासक्रमातील अडचणी दूर करून दिलासा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 05:00 IST

सेतू अभ्यासक्रम राबवित असताना हस्तपुस्तिका उपलब्ध झालेल्या नाहीत. हा अभ्यासक्रम ऑनलाईन राबवावा की ऑनलाईन हेच स्पष्ट होत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन पोहोचणे शक्य नाही. ग्रामीण भागातील पालकांचे अँड्रॉइड मोबाईल असले तरी ते त्यांच्या स्वतः जवळ असतात बरेच वेळा ते बाहेर असतात किंवा कुटुंबामध्ये एकपेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास त्यांची अडचण निर्माण होते. बऱ्याच ग्रामीण भागातील पालकांजवळ साधे मोबाईल आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सेतू अभ्यासक्रमातील अडचणी दूर करा किंवा विद्यार्थ्यांना शाळेत बोलण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. कोरोनाने २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रात नियमित शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे गत सत्रात विद्यार्थ्यांना आवश्यक अपेक्षित क्षमता संपादित न करता सर्व विद्यार्थी पुढील वर्गात प्रविष्ट झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी अपेक्षित क्षमता संपादित केले असे गृहीत धरून एससीईआरटी स्तरावरून सर्व विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम तयार केलेला आहे. सेतू अभ्यासक्रम राबवित असताना हस्तपुस्तिका उपलब्ध झालेल्या नाहीत. हा अभ्यासक्रम ऑनलाईन राबवावा की ऑनलाईन हेच स्पष्ट होत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन पोहोचणे शक्य नाही. ग्रामीण भागातील पालकांचे अँड्रॉइड मोबाईल असले तरी ते त्यांच्या स्वतः जवळ असतात बरेच वेळा ते बाहेर असतात किंवा कुटुंबामध्ये एकपेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास त्यांची अडचण निर्माण होते. बऱ्याच ग्रामीण भागातील पालकांजवळ साधे मोबाईल आहेत. सेतू अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर ४५ दिवसांच्या कालावधीत आठ दिवस हा सुट्टीचा कालावधी आहे ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असताना ४५ दिवसात अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार. तसेच जो पालक अशिक्षित आहे किंवा कामासाठी संपूर्ण दिवसभर घराबाहेर असतो अशा पालकांना व त्यांच्या पाल्यांना अभ्यासक्रम कसा व कोणत्या पद्धतीने देता येईल, असा प्रश्न निवेदनात नमूद आहे. गृहभेटीतून प्रत्येक पालक व  विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यात अनेक अडचणी येतात.  शालेय वातावरणाच्या बाहेर असल्यामुळे विद्यार्थी शिक्षकांना सहकार्य करत नाहीत. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद, सुधीर वाघमारे, संजीव बावनकर, मुकेश मेश्राम, राजू सिंगनजुडे, दिलीप बावनकर, राजेश सूर्यवंशी, रमेश कटेखाये, राधेश्याम आमकर, विनायक मोथारकर, भास्कर खेडीकर, मेश्राम, दिलीप गभने, रजनी करंजेकर, रमेश लोणारे, सेवकराम हटवार, नरेश देशमुख, राजन सव्वालाखे, शंकर नखाते, भैयालाल देशमुख, अनिल गयगये, राकेश चिचामे, दिनेश घोडीचोर, नामदेव गभने, योगेश कुटे, यामिनी गिऱ्हेपुंजे, संध्या गिऱ्हेपुंजे, शीलकुमार वैद्य, प्रकाश चाचेरे, सुरेंद्र उके, कैलास बुद्धे, देवानंद दुबे, महेश गावंडे, चेतन बोरकर, विवेक हजारे, हितेश उईके, सुधीर माकडे आदींचा समावेश होता.

कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू करा - एससीईआरटीद्वारे दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर अभ्यासक्रम राबविताना प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणीचा विचार कुठेही करण्यात आलेला नाही. त्या अडचणींवर उत्तर वरिष्ठांकडे किंवा प्रशासनाकडे नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीत हा विषय  मांडून एक ते आठच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के किंवा गटागटाने पालकांच्या परवानगीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन व उपाययोजनांचे पालन करून शाळेत बोलविण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी, अशी मागणी आहे. 

 

टॅग्स :Educationशिक्षण