शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर तालुक्यातील ४५ गावांत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:08 IST

तालुक्यात बहुतांश विहिरी, तलाव, बोळ्या यांनी तळ गाठला असून अनेक जलस्त्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. आदिवासी बहुल ४५ गावांत पाण्याचा ठणठणाट आहे. उन्हाळी धान पीक धोक्यात आले आहे. नदी, नाले कोरड्या पडल्या आहेत.

ठळक मुद्देविहिरीनींही गाठला तळ : नदीपात्र कोरडे, तलाव बनले क्रिकेटचे मैदान

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यात बहुतांश विहिरी, तलाव, बोळ्या यांनी तळ गाठला असून अनेक जलस्त्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. आदिवासी बहुल ४५ गावांत पाण्याचा ठणठणाट आहे. उन्हाळी धान पीक धोक्यात आले आहे. नदी, नाले कोरड्या पडल्या आहेत. अनेक गावात पाण्याकरिता वनवन भटकावे लागत आहे. बावनथडी धरण व कवलेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. मध्यप्रदेशातील पठार संघर्ष समितीने यापूर्वीच बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याकरिता एल्गार केला आहे.तुमसर तालुका धान उत्पादक तालुका असुन यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पीक शेतकऱ्यांनी लावला आहे. सध्या सूर्य आग ओकत असून विहिरी, तलावांनी तळ गाठला आहे. अनेक मोठी तलाव कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. कारली, बघेडा हे मोठे तलाव कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. चिचोली जवळील तलाव पूर्ण कोरडा पडला असून त्याचे रुपांतर मैदानात झाले आहे. चांदपूर तलावातही पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्याचे समजते.कडक उन्हामुळे झपाट्याने पाण्याचे बाष्पीभवन होते. नदी, तलाव, कोरडे पडल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सध्या एप्रिल महिन्याच सुरु आहे. मे महिन्यात पाण्याकरिता टँकर लावण्याची गरज प्रशासनाला करावी लागण्याची अधिक शक्यता आहे. मानवासोबतच वन्यप्राण्यांची पाण्याकरिता भटकंती सुरु आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी पाणी समस्या निर्माण झाल्याने प्रशासन खळबळून जागे झाले आहे. पाणीटंचाई व तीव्र पाणी टंचाईची गावे याची माहिती गोळा करणे सध्या सुरु आहे.बावनथडी धरणात उपलब्ध पाणी साठा २२.८५ टक्के असून धरणात पाण्याची पातळी ३३७ मीटर आहे. २१७ दलघमी इतका पाणी साठा उपलब्ध आहे. मृतसाठा १०.५१ टक्के आहे. कवलेवाडा बॅरेजमधून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी पं.स. सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केली आहे. कवलेवाडा बॅरेजमध्ये पाणीसाठा उपलबध आहे.बावनथडी धरणातून कारली जलाशयात पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी युवा नेते डॉ. पंकज कारेमोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आदिवासी बहुल गावात पाण्याकरिता भटकंती सुरु असून या गावात सर्व्हे करुन टंचाईग्रस्त गावांची यादी व आराखडा तयार करुन टँकरने पाणीपूरवठा करण्याची मागणीही डॉ. पंकज कारेमोरे यांनी केली आहे.बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याकरिता कटंगी, वारासिवनी येथील पठार संघर्ष समितीने एल्गार सुरु केला आहे. बावनथडी व कवलेवाडा बॅरेजमधून पाणी विसर्ग न केल्यास आंदोलनाचा इशारा पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे, डॉ. पंकज कारेमोरे यांनी दिला आहे.बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. १० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे.- क्षितीश मानवटकर,कार्यकारी अभियंता, भंडारा