शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
3
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
4
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
5
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
6
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
7
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
8
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
9
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
10
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
11
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
12
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
13
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
14
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
15
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
16
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
17
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
18
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
19
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच

लोक अदालतीत १,४४२ प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:07 IST

तालुका विधी सेवा समिती, साकोलीच्या वतीने दिवाणी न्यायालय, क स्तर साकोली येथे राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देसाकोली येथे आयोजन : ४३ लाखांची वसुली

आॅनलाईन लोकमतसाकोली : तालुका विधी सेवा समिती, साकोलीच्या वतीने दिवाणी न्यायालय, क स्तर साकोली येथे राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले. एकूण १४४२ प्रकरणे निकाली निघाली असून त्यातून ४३,६५,६८९ रूपयांची राष्ट्रीय लोकअदालतीतून दंड रूपाने वसुली करण्यात आली.यात २५३ प्रलंबित प्रकरणापैकी १४६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून त्यात मुख्यत्वे ५ वर्षापेक्षा जास्त जुने ५ दिवाणी प्रकरणे निकाली काढण्यात आले. प्रलंबित प्रकरणातून ७७ हजार रूपयांची वसुली करण्यात आली. पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणांमध्ये बँकेची ५०७ प्रकरणापैकी १५ प्रकरणे निकाली निघाली असून त्यातून २३,५१, ७३५ रूपयांची वसुली करण्यात आली. ४१ ग्रामपंचायतीच्या ३९५३ प्रकरणापैकी ११८४ प्रकरणातून १६,३१,८१२ रूपयांची वसुली करण्यात आली. नगर परिषदेच्या १८७ प्रकरणापैकी ६५ प्रकरणातून २,००,९४२ रूपयांची वसुली करण्यात आली.महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या १६ प्रकरणापैकी ४ प्रकरणे निकाली निघाली असून त्यातून ६३,११० रूपयांची वसुली करण्यात आली.बीएसएनएलच्या २४८ प्रकरणापैकी २६ प्रकरणे निकाली निघाली असून त्यातून २३,५०० रूपयांची वसुली करण्यात आली तर तहसिल कार्यालयाच्या ५५ प्रकरणापैकी २ प्रकरणे निकाली निघाली असून त्यातून १७,५९० रूपयाची वसुली करण्यात आली.एकूण १,४४२ प्रकरणे निकाली निघाली असून त्यातून ४३,६५,६८९ रूपयांची राष्ट्रीय लोकअदालतीतून दंड रूपाने वसुली करण्यात आली. राष्ट्रीय लोकअदालतच्या पॅनेलवर न्यायाधीश एन.के. वाळके, अ‍ॅड. पी.डब्ल्यु. खोब्रागडे, पी.एल.व्ही.जे.टी. रामटेके यांनी काम पाहिले तर तालुका वकील संघाचे अधिवक्ता, पोलीस कर्मचारी, तहसिल कार्यालयाचे कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, बँकेचे कर्मचारी, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे, नगर परिषदेचे कर्मचारी, बीएसएनएलचे कर्मचारी तसेच न्यायालयीनकर्मचारी बी.डी. कुलरकर, जी.के. उपासे, मानकर, व्ही.एस. भेदे, एस.एस. शामकुवर, आर.एस. खेताडे, एस.एन. मुंगुलमारे, एन.जी. रहांगडाले, पी.सी. मेश्राम, डी.के. गौर, आर.पी. वाघमारे यांनी सहकार्य केले.