शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगग्रस्तांना मिळणार तत्पर सेवा

By admin | Updated: September 17, 2015 00:35 IST

जिल्हा सामान्य रुग्णालय सामान्य जनतेला आरोग्याच्या सर्व अत्याधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

कर्करोग सेवेचा शुभारंभ : रामचंद्र्र अवसरे यांचे प्रतिपादनभंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालय सामान्य जनतेला आरोग्याच्या सर्व अत्याधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. यात आणखी एक पाऊल पुढे टाकत रुग्णालयाने कर्करोगाचे निदान व उपचार सेवेचा शुभारंभ करुन कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्करोग कक्ष व उपचार सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनीता बडे, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे अधिकारी रा.वा. कांबळे , जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे उपस्थित होते. यावेळी कर्करोग कक्षाचे उदघाटन अ‍ॅड. अवसरे यांनी केले. आ. अवसरे म्हणाले, कर्करोगाचे रुग्णांवर रुग्णालयात पूर्वीही उपचार होत असत. मात्र त्यासाठी आता नागपूर येथील दोन कर्करोग तज्ञांच्या सेवा येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील जनतेने करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र्र पातुरकर यांनी यासाठी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी डॉ. पातुरकर म्हणाले, आपल्याकडे कर्करोगाचे निदान लवकर होत नाही. कारण त्यासाठीची जागृती लोकांमध्ये नाही. त्यामुळे अगदी शेवटच्या स्टेजमध्ये गेल्यानंतरच रुग्णांना या आजाराची माहिती होते. त्यामुळे अनेक कर्करोग झालेल्या रुग्णांचा मृत्यू होतो. सामान्य रुग्णालयात नागपूर येथील कर्करोगतज्ज्ञ डॉ.अमित जयस्वाल यांची दर महिन्याच्या १६ तारखेला व डॉ. अभिषेक वैद्य यांची दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी सेवा उपलब्ध होणार आहे. तेव्हा नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. निदान, उपचार व मार्गदर्शन यासाठी हे दोन तज्ज्ञ उपलब्ध असणार आहेत. संचालन प्राजक्ता पेठे यांनी केले. प्रास्ताविक असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे अधिकारी रा.वा. कांबळे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)