शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

गोरगरीब रूग्णांची सेवा व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 22:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव कमी झाला असून या क्षेत्राचे आता व्यापारीकरण होऊ लागले आहे. रूग्णांची सेवा करणे हा धर्म राहिला नाही. परंतु, सर्वच रूग्णालयात असे प्रकार होत नाहीत. पेस हॉस्पीटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून रूग्णांची सेवा केली जावी, त्यांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा खासदार नाना ...

ठळक मुद्देनाना पटोले : जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव कमी झाला असून या क्षेत्राचे आता व्यापारीकरण होऊ लागले आहे. रूग्णांची सेवा करणे हा धर्म राहिला नाही. परंतु, सर्वच रूग्णालयात असे प्रकार होत नाहीत. पेस हॉस्पीटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून रूग्णांची सेवा केली जावी, त्यांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केली.भोंडेकर शिक्षण संस्थाद्वारा संचालित पेस हॉस्पीटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या नवीन रूग्णालयाचा पायाभरणी समारंभ आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने होते. अतिथी म्हणून माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, अ‍ॅड. वसंत एंचिलवार, सीएमडी डॉ.अश्विनी भोंडेकर, संजय रेहपाडे, डॉ.जगदीश निर्वाण, पायल मेश्राम उपस्थित होते.पुजा नर्सिंग कॉलेज परिसरात १५० बेडच्या नवीन मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाची पायाभरणी करण्यात आली. या रूग्णालयात लागू करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. संस्थेच्यावतीने खा.पटोले, खा. तुमाने, सुनिल मेंढे यांना शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.प्रास्ताविक पेस हॉस्पीटलच्या सीएमडी डॉ. अश्विनी भोंडेकर यांनी केले. खा. कृपाल तुमाने, सुनिल मेंढे, राजेंद्र पटले यांनी मार्गदर्शन केले. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी रूग्णांना सुविधा मिळणार असल्याची ग्वाही दिली.संचालन पायल भगत, मनिषा कुरंजेकर यांनी केले. आभार प्रा. मनोज बागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा.चोहले, चवळे, प्रा.शिंदे, प्रा.रत्नमाला मुनेश्वर, प्रा.कटकवार, किरण निमजे, कृष्णा ठोसरे, आतिष भिलकर, तांडेकर, राजेश मेश्राम, विनोद दोनाडकर, विश्वनाथ ठाकरे तसेच प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.