शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महिला सरपंचाच्या आत्महत्येने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:35 IST

भंडारा तालुक्‍यात राजकीय केंद्रबिंदू ठरणारी ठाणा ग्रामपंचायत येथे सरपंचासह १६ सदस्य आहेत. येथील लोकसंख्या नऊ हजारांच्या घरात आहे. सरपंच ...

भंडारा तालुक्‍यात राजकीय केंद्रबिंदू ठरणारी ठाणा ग्रामपंचायत येथे सरपंचासह १६ सदस्य आहेत. येथील लोकसंख्या नऊ हजारांच्या घरात आहे. सरपंच थेट जनतेतून निवडून दिले आहे. सरपंच म्हणून सुषमा पवार निवडून आल्या. तीन वर्षाचा कार्यकाळ लोटला. दरम्यान मंगळवार २९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता मासिक सभा घेण्यात आली. यात १३ सदस्य उपस्थित होते. विषय सूचीनुसार चर्चा करण्यात आली. कचरा गाडी अर्थात घंटागाडी खरेदी विषयक चर्चा सभेत रंगली. खरेदी केलेल्या वस्तूची पावती उपस्थित सदस्यांनी दाखविण्याचे विनंती सरपंच सुषमा पवार यांना केली. दरम्यान सरपंच यांनी पंख्याला गळफास लावून जीव देईल, असे बोलले असता उपस्थित सदस्यांनी एकसुराने येथे न करता बाहेर जाऊन काय करायचे ते करा, असे गुरुवार, ३१ डिसेंबर रोजी जवाहरनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. दरम्यान सभागृहाच्या मागील दार उघडून ४ वाजता तलावाच्या पाळीकडे पोहोचली असता उपस्थित सदस्य प्रशांत ढोमणे व इतर महिला सदस्यांनी मनधरणी करून सरपंचाला सभागृहात चर्चेत सहभागी केले. उच्चशिक्षित सरपंच यांची कृती पाहून पुढे कमीजास्त झाल्यास आपला बचावात्मक पवित्रा समजून उपसरपंच अरविंद तिरपुडे, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र किंदर्ले, निकेतन चवरे,जयश्री काटेखाये, रुपलता भागवत, प्रमिला मेश्राम , राहुल साखरे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

मंगळवार, २९ डिसेंबरच्या मासिक सभेत मी गमतीने तसे बोलले. तसा काही प्रकार केलेल्या नाही. नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न सदस्य करीत आहे. गावाचा विकास खुंटविण्याचा डाव आहे.

सुषमा पवार, सरपंच

ग्रामपंचायत ठाणा मासिक सभा सुरु असताना सभाध्यक्ष सुषमा पवार यांनी सदर उद्गार काढले . पण तसे काही केले नाही.

एच. डी . सतदेवे, ग्रामविकास अधिकारी

सरपंच यांनी बोललेल्या प्रकाराने सभागृहाबाहेर गेलेल्या सरपंचांची मनधरणी करून महिला सदस्य सोबत सभागृहात आणले .

प्रशांत ढोमणे, सदस्य,