शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

स्वयंरोजगारातून साधली ‘नवदुर्गां’नी आत्मोन्नत्ती

By admin | Updated: November 24, 2014 22:52 IST

व्यवसाय म्हटला की, पुरूषांची मक्तेदारी असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळते. कोणत्याही कामात पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांना सहकार्य करण्यापेक्षा समाजासमोर एक आदर्श ठेवण्याचा संकल्प

प्रशांत देसाई- भंडाराव्यवसाय म्हटला की, पुरूषांची मक्तेदारी असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळते. कोणत्याही कामात पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांना सहकार्य करण्यापेक्षा समाजासमोर एक आदर्श ठेवण्याचा संकल्प उराशी बाळगलेल्या भंडारा येथील नऊ बचत गटांच्या महिलांनी एकत्र येऊन उपहारगृह चालविण्याचा संकल्प केला. माविमच्या सहकार्यातुन या नवदुर्गांनी एकत्रित येऊन उपहारगृह चालविण्यासाठी टाकलेले पाऊल वाखाणाण्याजोगे आहे.उराशी बाळगलेले स्वप्न कृतीत उतरवून स्वप्नांना उंच भरारी देण्यासाठी प्रोत्साहनाची गरज भासते. मात्र त्यादृष्टीने टाकलेल्या प्रत्येक पावलांना ठेचा बसतात. त्यामुळे खचुन न जाता त्याचा सामना केल्यास आभाळही ठेंगणे वाटेल, ही प्रचिती ‘अन्नपूर्णा महिला उत्पादक बचतगट’च्या महिलांना आली आहे. वेगवेगळ्या गावातील नऊ महिला एकत्र येऊन स्वयंरोजगारातुन आत्मोन्नत्ती करण्यासाठी बांधलेली खुणगाठ समाजासमोर आदर्श ठरणारी आहे. पुरूषांची मक्तेदारी असलेल्या हॉटेल व उपाहारगृह चालविण्यासाठी या महिलांनी पुढाकार घेतला. सुरूवातीला त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. कधी आर्थिक तर कधी कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र त्यांनी न डगमगता सामना केला व अल्पावधीतच त्यांनी सुरू केलेले ‘स्वच्छ उपहारगृह' नावाप्रमाणेच सर्वांच्या मनात घर केले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने उद्योजिका बनलेल्या महिलांना आर्थिक बळकटी मिळाली आहे. भंडारा जिल्ह्यातील ज्या नऊ महिलांनी उपहारगृह सुरू केला त्यात, लता विनोद राखडे (दवडीपार), सविता सुरेश गजभिये ( मुजबी), सुरेखा राजेश गजभिये (मुजबी), हिरा सुरेश निंबार्ते (बेला), जया हरिभाऊ मेहर (गणेशपूर), वर्षा कैलास कुंभरे (कोकनागड), जयश्री विनोद वंजारी (मौदी), नंदा नरेंद्र हुमने (सिल्ली) व अरूणा सुभाष चामट (डोंगरगाव) या 'नवदुर्गां'चा समावेश आहे. त्यांनी एकत्र येऊन अन्नपूर्णा महिला उत्पादक बचतगटाची निर्मिती केली. या नवदुर्गांना एकत्रित आणल्यानंतर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी यांनी जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा तीन हजार रूपयाप्रमाणे उपलब्ध करुन दिली आहे. या उपहारगृहात दोसा, ईडली, सांबारवडा, कटलेट, दहीवडा, साबुदाना वडा व खिचडी, पोहा, चहा, कॉफीसह जेवनही येथे मिळते. हेवेदावे न ठेवता, स्वत:चे कर्तव्य व जबाबदारी समजुन सर्व कामे गुण्यागोविंदाने करतात. या महिला उपहारगृहाच्या मालक असल्या तरी, त्याच कुकची भुमिकाही बजावतात. सर्व महिलांना कामांचे नियोजन करुन देण्यात आले आहे. त्यानुसार काही चहा, नास्ता देतात, काही साहित्य खरेदी करतात, काही महिला आॅर्डर घेतात तर काही पैशाचा व्यवहार सांभाळतात. पंधरा दिवसानंतर कामांची अदलाबदल करतात. पुरूषांच्या तुलनेत कुठेही कमी नसलेल्या या नवदुर्गांनी सुरू केलेल्या उपहारगृहाच्या माध्यमातुन सर्व खर्च वजा जाता प्रत्येक सदस्याला तीन हजार रूपये मिळतात. त्यांचे हे पाऊल समाजपरिवर्तनाची नांदी ठरणारी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.