शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांनी जप्त केलेल्या रेतीची पुन्हा चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 23:14 IST

मोहगाव (टोली) ते सूर नदी रोहणा रस्त्याच्या कडेला रेती माफियांनी सूर नदी पात्रातील रेती काढून मोठमोठे ढिगारे तयार करून ठेवले होते व ही रेती दररोज रात्रीला दहा चाकी टिप्परद्वारे नागपूरला पोहचविली जात होती. याची तक्रार नागरिकांनी महसूल विभागाला केल्यावर तहसीलदारांनी १३ आॅगस्टच्या सायंकाळी दोन पोलिसांसोबत जावून ते रेतीचे ढिगारे जप्त केले. मात्र जप्त केलेल्या त्या ढिगाऱ्याची रेती चोरांनी रात्रभरात पार साफ करून टाकल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणात आता सावरासावर केली जात आहे.

सिराज शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : मोहगाव (टोली) ते सूर नदी रोहणा रस्त्याच्या कडेला रेती माफियांनी सूर नदी पात्रातील रेती काढून मोठमोठे ढिगारे तयार करून ठेवले होते व ही रेती दररोज रात्रीला दहा चाकी टिप्परद्वारे नागपूरला पोहचविली जात होती. याची तक्रार नागरिकांनी महसूल विभागाला केल्यावर तहसीलदारांनी १३ आॅगस्टच्या सायंकाळी दोन पोलिसांसोबत जावून ते रेतीचे ढिगारे जप्त केले. मात्र जप्त केलेल्या त्या ढिगाऱ्याची रेती चोरांनी रात्रभरात पार साफ करून टाकल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणात आता सावरासावर केली जात आहे.मोहगाव (टोली) रेती घाटाजवळील एक रेतीचा ढिगारा तहसीलदार मोहाडी यांनी जप्त करून त्याचा लिलाव केला. मात्र त्याच्या जवळच मोहगाव (टोली) ते सूरनदीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला रेती माफियांनी वाघमारे यांच्या शेताजवळ सूर नदीच्या पात्रातील रेती काढून मोठमोठे रेतीचे ढिगारे तयार केले होते. अनेक दिवसापासून दररोज रात्री दोन वाजेपासून पहाटे सात ते आठ वाजेपर्यंत जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रातून रेती काढून ती रेती ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाघमारे यांच्या शेताजवळील खुल्या जागेत जमा करण्यात येत होती. दिवसभर येथे कोणतीही हालचाल दिसत नव्हती. मात्र रात्री आठ वाजेनंतर या ठिकाणी दहा चाकी टिप्पर व ट्रकच्या रांगा लागायच्या व जमा केलेली संपूर्ण रेती रात्रभरात साफ केली जायची. हा नित्यक्रम होता. जिल्हा परिषदेच्या त्या रस्त्याची पुरती वाट लागलेली होती. नागरिकांना येण्याजाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.मी ते ढिगारे जप्त केलेले नव्हते. मी व माझे सहकारी तथा पोलीस काल जेव्हा गेलो तर रस्त्यावर विटांच्या तुकड्याने रस्ता अडविण्यात आला होता. विटांचे तुकडे हटवून पुढे गेलो तर रस्त्यावर मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. जेणेकरून आम्हाला तेथे पोहचता येवू नये. खड्डा बुजविण्यापर्यंत तेथील पाच, सहा टिप्पर व जेसीबी दुसºया रस्त्याने पळून गेले. ते ढिगारे तलाठ्यांनी चारपाच दिवसापूर्वीच जप्त केले होते. तेथील संपूर्ण रेती चोरीला गेली की नाही याची चौकशी करणार आहे.-सूर्यकांत पाटील, तहसीलदार, मोहाडी.