शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

बियाण्यांची टंचाई भेडसावणार !

By admin | Updated: June 11, 2017 00:14 IST

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ४० हजार १३५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली.

खरीप हंगाम तोंडावर : केवळ १७,५२९ क्विंटल बियाणे उपलब्धदेवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्कयावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ४० हजार १३५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली. दि.३१ मे अखेर केवळ १७ हजार ५२९ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. मागणीपेक्षा बियाणांचा पुरवठा कमी झाला असल्याने जिल्ह्यात बियाण्यांची तीव्र टंचाई भेडसावण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यात खरीप हंगाम सन २०१७-१८ करीता भातासाठी ३८ हजार ८७० क्विंटल, सोयाबीनसाठी ५६५ क्विंटल आणि तुरसाठी ७०० क्विंटल असे एकूण ४० हजार १३५ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली. त्यापैकी महाबिजमार्फत भाताचे १४ हजार ७० क्विंटल, सोयाबिनचे १८५ क्विंटल व तुरीचे ३०० क्विंटल असे एकूण १४ हजार ५५५ क्विंटल बियाणांची मागणी तर, खासगीमार्फत भाताचे २४ हजार ८०० क्विंटल, सोयाबिनचे ३८० क्विंटल व तुरीचे ४०० क्विंटल, असे एकूण २५ हजार ५८० क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली. आयुक्तालयाकडून भाताकरीता १७ हजार ३५४ क्विंटल, सोयाबिनसाठी ३५ क्विंटल व तुरीकरीता १३९.३ क्विंटल असे एकूण १७ हजार ५२९ क्विंटल बियाणे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. मागिलवर्षी सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात भाताखालील सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ७६ हजार हेक्टर असून प्रत्यक्षात १ लाख ७३ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. सन २०१६-१७ मध्ये जिल्हा परिषदेने खरीप हंगामासाठी भाताकरीता ३३ हजार २०० क्विंटल, सोयाबिनकरीता ३ हजार ८०० व तुरीकरीता ६५० क्विंटल, असे एकूण ३७ हजार ६५० क्विंटल बियाणांची मागणी नोंदविली होती. त्यापैकी भाताचे ३० हजार ५३१ क्विंटल, सोयाबिनचे ३२१ व तुरीचे १६० क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले होते. यावर्षीच्या खरीप पिकाच्या नियोजनामध्ये जिल्ह्यात भात, सोयाबिन व तूर हे तीन प्रमुख पिके आहेत. भात पिकाचे क्षेत्रात तीन हेक्टरने वाढण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने नोंदविली आहे. यावर्षी प्रशासनाने भातपिकासाठी ३८ हजार ८७० क्विंटल बियाणांची मागणी केली असली तरी कृषी आयुक्तालयाकडून ३१ मे अखेर १७ हजार ३५४ क्विंटल भात बियाणांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे. दमदार पावसाच्या आगमनानंतर शेतकऱ्यांसाठी पुन्हा २२बियाण्यांचा मुबलक पुरवठा करण्यात येईल, असे जिल्हा परीषद कृषी विभागाकडून सांगण्यात आले.बळीराजा बियाण्यांच्या जुळवाजुळवीत व्यस्तशेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी, उन्हाळवाही, काडी-कचरा वेचणी आदी मशागतीची कामे पूर्ण केली आहे. शेतामध्ये शेणखते पसरविण्याचेही काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे धरणी हिरवा शालू नेसण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे. बळीराजा आता बियाण्यांची कशीबशी जुळवाजुळव करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र दमदार पाऊस न कोसळल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. मागील वर्षीचा दुबार, तिबार पेरणीचा अनुभव बघता बळीराजा यावर्षी पेरणीकरिता सध्या कोणतीही "रिस्क" न घेण्याच्या भूमिकेत दिसत आहे. आपल्याकडील शेती निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. पावसावरच शेतकऱ्यांचे संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. शेती दिवसेंदिवस बेभरवशाची झाली असून मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च आणि कुटुंबाचा भार पेलतानाच खरीप हंगामाच्या बियाण्यांची जुळवाजुळव करताना उसणवारी करून कर्ज काढल्याशिवाय शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय दिसत नाही.