शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वाघांचे संरक्षण करणार सुरक्षा दल

By admin | Updated: January 11, 2017 00:30 IST

राष्ट्रीय व्याघ्र संर्वधन प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया अंतर्गत तीन विशेष व्याघ्र संरक्षण दलाची स्थापना करण्यात आली आहे.

कोका अभयारण्य : मानव व वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी संरक्षण दलाची भूमिका महत्त्वाची आमगाव (दिघोरी) : राष्ट्रीय व्याघ्र संर्वधन प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया अंतर्गत तीन विशेष व्याघ्र संरक्षण दलाची स्थापना करण्यात आली आहे. कोका अभयारण्यामध्ये वाघांच्या संरक्षण व संवर्धनाची जवाबदारी हे सुरक्षा कर्मचारी करणार आहेत.वाघांची संख्या झपाट्याने कमी होत असून अवैध शिकारीमुळे या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ते टिकवून ठेवण्यासाठी व या प्राण्यांची जोपासणा करण्यासाठी शासन अनेक उपाययोजना करीत आहे. त्याच अनुसंगाने शासनाने आरक्षित केलेल्या व्याघ्र प्रकल्पामध्ये विशेष व्याघ्र संरक्षण दलाची स्थापना करण्यात आली असून याची जवाबदारी हे संरक्षण दल करणार आहेत. कोका अभयारण्यामध्ये या सुरक्षा दलामध्ये २१ महिला व १० पुरूष सुरक्षाकर्मी असून १ महिला परिक्षेत्राधिकारी आहे.हे विशेष दल जंगलातील अवैध शिकारीला आळा घालणे, अवैध वृक्षतोड थांबविणे, जंगलातील चराईला आळा घालणे, जंगलातील अवैध उत्खन्न रोखने व जंगलातील अतिक्रमणावर आळा घालणार असून जंगलांची झालेली ऱ्हास रोखण्याचे काम करणार आहेत. तसेच मानव व वन्यजीव यांच्यातील होणारा संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने जनतेमध्ये जनजागृती करण्याचे काम करणार आहेत. या अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीव अस्तित्वात असून अभयारण्याला लागून असलेल्या गावकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान सहन करावा लागत आहे. तसेच वन्यप्राण्यांमुळे जीवहानी व जखमी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे मानव व वन्यप्राणी यामध्ये संघर्ष टाळण्यासाठी या संरक्षण दलाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. (वार्ताहर)