शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत एसटीला १५ काेटींचा ताेटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:42 IST

भंडारा विभागांतर्गत भंडारा आणि गाेंदिया या दाेन जिल्ह्यांचा समावेश हाेताे. भंडारा, साकाेली, तुमसर, पवनी, गाेंदिया आणि तिराेडा हे सहा ...

भंडारा विभागांतर्गत भंडारा आणि गाेंदिया या दाेन जिल्ह्यांचा समावेश हाेताे. भंडारा, साकाेली, तुमसर, पवनी, गाेंदिया आणि तिराेडा हे सहा आगार आहेत. या सहा आगारांतर्गत ३६७ बस धावतात. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत एसटीचे चाक जागावर थांबले. १५ एप्रिल ते १ जूनपर्यंत प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद हाेती. विशेष म्हणजे एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने लग्नसराईचे आहेत. या काळात एसटी महामंडळाला प्रति दिवशी ३५ लाख रुपयांचे उत्पन्न हाेते; परंतु काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत या काळात ४५ दिवस बस बंद हाेती. परिणामी, एसटी महामंडळाला १५ काेटी ७५ लाख रुपयांचा ताेटा झाला. आता ३६७ बसपैकी २९३ बस धावत आहे. प्रति दिवशी ९० हजार किलाेमीटरचे अंतर कापत आहे. मात्र, काेराेनाच्या ४५ दिवसांतील ताेटा भरून काढण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे.

बाॅक्स

दरराेज लागते १७ लाखांचे डिझेल

काेराेनानंतर एसटी पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. सध्या भंडारा आगारातील बस दर दिवशी ९० हजार किमी चालतात. त्यासाठी सरासरी १८ हजार लिटर डिझेल लागते. डिझेलचे दर ९८ रुपये प्रति लिटर असून दरराेज महामंडळाला १७ लाख ६४ हजार रुपये डिझेलसाठी खर्च करावे लागत आहेत. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी अवस्था सध्या आहे.

बाॅक्स

डिझेल दर वाढले, तिकीट मात्र तेच

आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दरवाढीचा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. ६० रुपये प्रति लिटर डिझेलचे दर हाेते, तेव्हा तिकिटाचे दर हाेते तेवढेच आताही आहेत. उलट डिझेलचे दर ६० रुपयांवरून ९८ रुपयांवर पाेहाेचले आहे. दाेन वर्षांत तिकिटांचे दर मात्र वाढले नाही. डिझेलच्या वाढत्या दराचे गणित उत्पन्नाशी निगडित असून यामुळे सर्वाधिक ताेटा महामंडळाला सहन करावा लागत आहे.

बाॅक्स

दाेन महिन्यांपासून पगार नाही

एसटी महामंडळाची बस धावायला लागली असली तरी दाेन महिन्यांपासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगारच झाला नाही. आधीच चालक वाहकांना कमी वेतन त्यात आता दाेन महिन्यांपासून वेतनच नसल्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकणे माेठे कठीण झाले आहे. आता वेतन कधी हाेणार, याची प्रतीक्षा आहे.

काेट

भंडारा विभागात एसटी बस सुरू झाले आहे. मात्र, अद्यापही प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद दिसत नाही. लग्नसराईच्या काळात बंद असलेल्या बसेसचा फटका महामंडळाला बसला आहे. प्रवाशांनी सुरक्षित प्रवाशासाठी एसटीनेच प्रवास करावा.

- डाॅ. चंद्रकांत वडसकर

विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा