शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्यात श्वानपथकाच्या सहाय्याने शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:39 IST

अशोक पारधी। लोकमत न्यूज नेटवर्क पवनी : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात दोन वाघांचे मृतदेह आढळून आलेल्या नागाच्या बोडीत श्वान पथकाच्या सहाय्याने ...

ठळक मुद्देदोन वाघांच्या मृत्यूचे प्रकरण : रानडुकरावरील विषप्रयोगाचा शोध जारी

अशोक पारधी।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात दोन वाघांचे मृतदेह आढळून आलेल्या नागाच्या बोडीत श्वान पथकाच्या सहाय्याने वन्यजीव विभागाने शोधमोहीम सुरु केली आहे. वाघांनी खाल्लेल्या रानडुकरांवर कुणी विषप्रयोग केला याचा शोध घेतला जात आहे. तुर्तास वन्यजीव विभागाच्या हाती काहीही लागले नाही. मात्र दोन वाघांच्या मृत्यूने पर्यटकांत हळहळ व्यक्त होत आहे.पवनी तालुक्याच्या चिचगाव कंपार्टमेंट क्रमांक २२६ मध्ये चार्जर आणि राही या दोन वाघांचे मृतदेह आढळून आले होते. ८०० मीटर अंतरात दोन्ही वाघांचे मृतदेह दिसून आले. विशेष म्हणजे रविवारी चार्जर या नर वाघाचा मृतदेह तर सोमवारी राही या वाघीणीचा मृतदेह आढळला होता. मात्र राहीचा मृत्यू चार्जरच्या पूर्वी २४ तास आधी झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून पुढे आले आहे. तसेच या दोन्ही वाघांनी खाल्लेल्या रानडुकरावर विषप्रयोग झाला होता. तेही शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. या दोन्ही वाघांच्या पोटात रानडुकरांचे मांस व केस आढळून आले. तसेच याच परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या उदमांजराच्या पोटातही याच रानडुकराचे मांस आढळले. त्यामुळे विषबाधेमुळेच या दोन्ही वाघांचा मृत्यू झाल्याच्या निष्कर्षाप्रत वन्यजीव विभाग पोहचला आहे. आता या रानडुकरावर विषप्रयोग कुणी केला याचा शोध घेतला जात आहे. वाघांचे मृतदेह आढळून आले त्या नागाच्या बोडीत शोधमोहीम राबविली जात आहे. परंतु अद्यापर्यंत वन्यजीव विभागाच्या हाती काहीही लागले नाही. नेमका रानडुकरावर विषप्रयोग कुणी केला आणि कोणत्या कारणासाठी केला याचा शोध घेतला जात आहे.ठोस पुरावे गवसल्याचा ‘वन्यजीव’चा दावावन्यजीव विभागाच्या वतीने नागपूर व चंद्रपूर येथून पाचारण केलेल्या श्वानाच्या मदतीने दोन वाघांच्या मृत्यूचा शोध घेतला जात आहे. वन्यजीव विभागाच्या हाती महत्वपूर्ण सुगावे लागले असून त्या अनुषंगाने बुधवारी चौकशी करण्यात येणार आहे. अद्यापपर्यंत कुणालाही ताब्यात घेतले नसून संशयीत व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सहाय्यक वनसंरक्षक गजानन बोबडे यांच्या मार्गदर्शनात तपास कार्य करण्यात येत आहे.