शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

आमदारांकडून प्रकल्प अधिकाऱ्याची झडती

By admin | Updated: August 26, 2016 00:32 IST

जिल्ह्यातील एकमेव शासकीय आश्रमशाळा खापा (खुर्द) येथे नेहा हनेश उईके (१४) रा.कारली येथील निवासी विद्यार्थिनीने

नेहा उईके आत्महत्या प्रकरण : आत्महत्येचे गूढ अद्याप कायम आलेसूर : जिल्ह्यातील एकमेव शासकीय आश्रमशाळा खापा (खुर्द) येथे नेहा हनेश उईके (१४) रा.कारली येथील निवासी विद्यार्थिनीने वस्तीगृहातील कक्षेत पंख्याला ओढणी बांधून आत्महत्या केली. त्यामुळे गावखेड्यात पुन्हा गाड्यांच्या ‘रेला रे’ सुरु झाला आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत आमदार चरण वाघमारे दोन दिवसापासून सखोल चौकशी करीत आहेत. यात प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरत तासभर घटनास्थळी झडती घेतली. अभ्यासू आमदार असल्यामुळे आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारले असता चांगलाच घाम फुटला. या घटनेचे पोलीस तपासाची चक्रे तीव्र गतीने फिरत असूनही आत्महत्येचे गुढ रहस्य कायम आहे.या आश्रमशाळेत निवासी तथा अनिवासी मुले ७३ व मुली ८८ अशी एकूण १६१ पटसंख्या आहे. मात्र या घटनेच्या सावटात निम्मे विद्यार्थ्यांनी आपल्या पाऊलवाटा घराकडे वळविल्या आहेत. या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंत शैक्षणिक सुविधा असूनही उपस्थितीअभावी कित्येक वर्गखोल्या ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या प्रकरणात आमदार चरण वाघमारे यांनी आश्रमशाळेची पाहणी केली. यात मूलभूत सुविधेअंतर्गत बऱ्याच समस्या दिसून आल्या. शाळेतील मुख्याध्यापक, अधीक्षक, अधीक्षिका, शिक्षक व कर्मचारीवृंद यांना प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेले निेर्देश जणू वेशीवर टांगल्याचे निष्पन्न झाले. परिणामी या घटनेत कोणाचे जहाज बुडते हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. वस्तीगृहातील कोठीघरात तांदूळ, तुरडाळ, पुरवठाधारकाकडून उच्चतम गुणवत्तेचा नसून अप्रमाणित चाचणी न केलेला पुरवठा अन्न शिजविण्यात येणाऱ्या पाण्याचा ड्रममध्ये गढूळ पाणी, दैनंदिन आहारात फेरबदल, विद्यार्थ्यांना मिळणारे बेडींग साहित्य, जोडे मोजे नाईट ड्रेस, टॉवेल, दंतमंजन, साबण, खोबरेतेल, नास्ता या दैनंदिन व जीवनावश्यक वस्तूत रेकॉर्ड अंतर्गत बरीच तफावत आढळून आली. शैक्षणिक गुणवत्तेअंतर्गत आमदार व विद्यार्थ्यांच्या संवादात, इंग्रजी, गणित व सामान्य ज्ञानात कित्येक प्रश्न अनुउत्तरीत होते. त्यामुळे बौद्धीक व सर्वांगिण विकासासाठी शिक्षकांची भूमिका बघ्याची ठरली. शासनाकडून दरवर्षी मिळणारा लाखो रूपयाचा निधी झिरपतो कुठे हा प्रश्न उभा झाला आहे. (वार्ताहर)जिल्ह्यात पावसाची हजेरीभंडारा : मागील २० दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पावसाने भंडारा, तुमसर, लाखनी, साकोली परिसरात पावसाने हजेरी लावली. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवे येत असली तरी पाऊस मात्र काही पडत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी यावर्षी शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागणार आहे.याावर्षी पावसाने पहिलेपासूनच दगा दिला आहे. आतातरी पावसाने अंत पाहू नये यासाठी शेतकऱ्यांचे यज्ञ सुरू आहे. जन्माष्टमीपर्यंत पूर्ण होणारी रोवणी यावर्षी अर्ध्यावरच राहिली आहे. (नगर प्रतिनिधी)