शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बालकांचे शोधकार्य सामाजिक भावनेतून

By admin | Updated: July 10, 2015 01:18 IST

प्रत्येक बालक शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे. शिक्षणापासून कोणत्याही घटकातील बालके वंचित राहू नयेत. शिक्षण घेणं हा मुलांचा हक्क आहे.

पोहनकर यांचे प्रतिपादन : तालुका प्रशासनाच्या वतीने सहकार्याचे आवाहनमोहाडी : प्रत्येक बालक शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे. शिक्षणापासून कोणत्याही घटकातील बालके वंचित राहू नयेत. शिक्षण घेणं हा मुलांचा हक्क आहे. त्यासाठी दुलक्षित बालकांचा शोध गंभीरतेने घेण्यात यावा. शिक्षण क्षेत्राशी जुडलेल्या प्रत्येक घटकांनी या शोध कार्यात मदत करावी. तसेच शिक्षकांनी शाळा बाह्य बालकांचा शोध सामाजिक कार्य समजून करावे असे आवाहन शाळा बाह्य सर्वेक्षण तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार पोहनकर यांनी केले.मोहाडी पंचायत समितीच्या सभा कक्षात शाळा बाह्य मुलांचे सर्वेक्षण या विषयावर मुख्याध्यापक, केद्रप्रमुख यांची सभा तहसीलदार पोहनकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला खंडविकास अधिकारी लांजेवार, गटशिक्षणाधिकारी एस. बी. राठोड, पोलिस निरीक्षक गुंजवटे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भाष्कर गभणे, शिक्षण विस्तार अधिकारी विभावरी पडोळे यांची उपस्थिती होती. सभेत उपस्थित अधिकाऱ्यांनी शाळा बाह्य मुलांचे सर्वेक्षण कसे करावे याबाबत माहिती दिली. (तालुका प्रतिनिधी)३०,०३४ कुटुंबाचे सर्वेक्षण होणारमोहाडी तालुक्यात ३०,०३४ कुटूंब संख्या आहे. या कुटुंबाचे सर्वेक्षण ३२४ शिक्षक करणार आहेत. या शिक्षकांची नियुक्ती सर्वेक्षण अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. हे अधिकारी किमान शंभर कुटुंबांचे सर्वेक्षण करतील. एकही बालक सर्वेक्षणातून सुटू नये यासाठी गाव स्तरावर समित्या गठित करण्यात आल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सर्वेक्षण करणारे अधिकारी शिक्षक स्थानिकच राहणार आहेत. ११ जुलै रोजी ६ ते १४ वयोगटातील सर्वेक्षण होणार आहे. मोहाडी तालुक्यातील रेल्वेस्टेशन बसस्टॉप, हॉटेल, कारखाने, वीटभट्टी, स्थलांतरीत कुटूंब आदींसाठी सर्वेक्षण करण्यासाठी आठ विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.वरठी, मोहगावदेवी, महालगाव, चोरखमारी, एलोरा पेपरमील, देव्हाडा, मोहाडी या गावांचे सर्वेक्षण विशेष पथकाद्वारे करण्यात येणार आहे. सर्वेक्षण सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत करायचे आहे.२० सर्वेक्षण अधिकाऱ्यांमागे एक झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १६ झोनल अधिकारी मुख्याध्यापक राहणार आहेत. झोनल अधिकारी सर्वेक्षकांवर नियंत्रण करतील. तसेच त्यांच्याजवळून माहिती संकलित करुन त्याच दिवशी माहिती झोनल अधिकारी केंद्र प्रमुखांकडे सादर करणार आहेत. शाळा बाह्य विद्यार्थ्यांचा सर्वेक्षणासाठी आठ केंद्रप्रमुख, चार विस्तार अधिकारी, फिरते शिक्षक आदी मदत करणार आहेत.