शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बससाठी शालेय विद्यार्थ्यांनी अडविला राज्य महामार्ग

By admin | Updated: September 9, 2016 01:43 IST

हात दाखवा आणि बस थांबवा व गाव तिथे बस हा एस. टी. महामंडळाने केलेला दावा सोनी या गावात बस येत

सोनी येथील घटना : मागणी करूनही परिवहन मंडळाचे दुर्लक्षलाखांदूर : हात दाखवा आणि बस थांबवा व गाव तिथे बस हा एस. टी. महामंडळाने केलेला दावा सोनी या गावात बस येत नसल्याने व जलद बस थांबत नसल्याने सोनी येथील विद्यार्थ्यांनी वाहतूक अडविल्यामुळे हा दावा फोल ठरला. पवनीच्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्ग काढण्यासाठी नकार दिल्याने तहसीलदार व पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थीने आंदोलन निवळले.सध्या एस. टी. महामंडळाने बस वेळापत्रकाचा बेलगाम आदेश काढल्याने सर्वसामन्यासोबत शालेय विद्यार्थ्यांची फरफट होत आहे. शाळेच्या वेळेवर बस नाही, बस कदाचित आलीच तर गर्दी असल्या कारणाने नजीकच्या बसस्थानकावर प्रवाशांसाठी थांबत नाही. त्यामुळे सोनी येथील विध्यार्थी व पालकानी तहसीलदार लाखांदूर मार्फत शाखा व्यवस्थापक बस डेपो पवनी यांना निवेदन सादर करून तात्काळ लाखांदूर - वडसा मार्गे बस सुरु करा अन्यथा रस्ता अडवून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु शाखा व्यवस्थापक बस डेपो पवनी यांनी तहसीलदार लाखांदूर यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत बस सोडण्यास नकार दिला. अखेर नाईलाजास्तव आज गुरुवारला सोनी येथील शेकडो विध्याथ्यार्नी सकाळपासूनच लाखांदूर - वडासा मार्ग सोनी बस स्थानकावर अडवून धरला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्यांची रीघ लागली. हळू हळू पालकांची गर्दी वाढली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पवनीचे आगार व्यवस्थापक यांचेशी भ्रमणध्वनी वरून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बोलण्यात आले मात्र त्यांनी घटनास्थळी येण्यासाठी नकार दिल्याने लाखांदूरचे पोलीस निरीक्षक देविदास भोयर व तहसीलदार तोडासाम यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकूण घेतल्या. त्यांनी विद्यार्थ्यांचा हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. परंतु एकदा बस सुरु केल्यानंतर लगेच दोन दिवसात बस बंद करण्यात येत असल्याने वारंवार आंदोलन करणे व निवेदन देणे बरोबर नसल्याचे सांगून निर्णय आत्ताच पाहिजे, म्हणून विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला. अखेर लेखी आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आला. यावेळी विद्यार्थी मोठया संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी )