शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘टेकू’वर उभी आहे शाळेची भिस्त

By admin | Updated: March 27, 2017 00:29 IST

शैक्षणिक प्रगतीसाठी धडपडणारे शासन अन् प्रशासन. पण, दुसरीकडे ग्रामीण भागातील शाळांच्या इमारती जीवघेण्या आहेत.

अपघाताची शक्यता : इमारतीला तडे, मरणाची वाट बघणार काय?मोहाडी : शैक्षणिक प्रगतीसाठी धडपडणारे शासन अन् प्रशासन. पण, दुसरीकडे ग्रामीण भागातील शाळांच्या इमारती जीवघेण्या आहेत. कान्हळगाव/ सिरसोली येथील प्राथमिक शाळा 'टेकू'वर उभी आहे. ती कधीही कोसळू शकते. तथापि, शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. गुणवत्तेसाठी शिक्षण खाते विविध प्रयोग करीत आहे. त्यामुळे शिक्षक गुणवत्तेच्या दावणीला बांधली गेली आहेत. शिक्षणाचा दर्जा कदाचित उधारेलही, पण ज्या शाळेत विद्यार्थी सुरक्षित आहेत काय, असा सवाल निर्माण व्हायला जागा आहे. जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारती विद्यार्थ्यांच्या मृत्यूची वाट तर बघत नाही ना? १९३४ या साली कान्हळगाव/ सिरसोली येथे जिल्हा परिषदेची शाळा उभी केली गेली. पंधरा वर्षापूर्वी त्या शाळेची उंची कमी करण्यात आली. एवढीच दुरुस्ती जिल्हा परिषद कान्हळगावच्या शाळेची करण्यात आली. इमारतीची उंची कमी झाली पण, समस्या आजही कायम आहे. ८३ वर्षापुर्वी तयार झालेली कान्हळगाव शाळेची इमारत धोकादायक स्थितीत आहे. याबाबद शाळेच्या शिक्षण समितीने शिक्षण विभागाला वारंवार कळविले. मात्र शिक्षण विभागाने गंभीर बाबीची आजपर्यंत दखल घेतली नाही. जिल्हा परिषद शाळा कान्हळगावच्या शाळेचा कौलरु छत लोखंडी खांबाच्या 'टेकू'वर उभा आहे. लाकडी फाटे जिर्ण होवू तुटली, वाकली आहेत. छतावरील कवेलू तुटलेल्या आहेत. काही भागात कवेलू नसल्याने प्लॉस्टीक टाकण्यात आली आहे. इमारतीला भेगा पडलेल्या आहेत. जागोजागी इमारतीला तडे गेले असल्याने मोठ्या धोक्याची सुचना देत आहे. इमारतीत असलेल्या कुबड्या विद्यार्थ्यांच्या असुरक्षिततेला मारक ठरल्या आहेत. अगदी वरच्या भागावर 'यम' प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या मृत्यूची प्रतिक्षा करीत असल्याची चिन्हे आहेत. सुरक्षिततेची हमी स्विकारणारे शिक्षण विभाग टाळाटाळ का करीत आहे. असा सवाल आहे. (तालुका प्रतिनिधी)शाळेच्या दुरुस्तीबाबत ठराव दिले गेले. मंजूरी मिळूनही कामात अडथळा आणला. विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पडवीस बसावावे लागते.- गणेश ठवकरअध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीतीन दिवसापुर्वी पून्हा शाळेची इमारत धोकादायक असल्याबाबद अधिकाऱ्यांना लेखी कळविले आहे. - जगदिश निमजे, मुख्याध्यापक