शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शिक्षकावर शाळा व्यवस्थापन करणार कारवाई?

By admin | Updated: December 26, 2016 00:55 IST

युवतीला प्रेमजाळ्यात ओढून शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या धिरज खाटीक या शिक्षकाला भंडारा पोलिसांनी अटक केली आहे.

प्रकरण युवतीवर अत्याचाराचे : शैक्षणिक वर्तुळात खळबळ भंडारा : युवतीला प्रेमजाळ्यात ओढून शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या धिरज खाटीक या शिक्षकाला भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. हा शिक्षक शहापूर येथील नानाजी जोशी महाविद्यालयात कार्यरत असून शाळा व्यवस्थापन त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे समजते. शहरातील संत तुकडोजी वॉर्डातील धिरज पांडुरंग खाटीक हा शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक आहे. त्याचे वॉर्डातीलच एका ३३ वर्षीय युवतीशी मागील काही वर्षांपासून पे्रमसंबंध होते. यातून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र कालांतराने त्याने तिला धोका देवून तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. दरम्यान त्याचे विवाह अन्य एका युवतीशी जुळल्याची माहिती सदर युवतीला होताच तिने धिरजने फसवणूक केल्याची तक्रार भंडारा पोलिसात दिली. यावरुन त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. युवतीच्या तक्रारीवरुन आता भंडारा पोलीस सदर शिक्षकाचे कपडे हस्तगत करणार असून धिरजने सदर युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केलेल्या स्थळी नेऊन चौकशी करणार असल्याची माहितीही उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांनी ‘लोकमत’ ला दिली. नानाजी जोशी महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्तुळात मोठी ख्याती आहे. अश्या नामांकित संस्थेतील धिरजच्या दुष्कृत्यामुळे संस्था बदनाम होत आहे. त्यामुळे धिरजवर शाळा व्यवस्थापन समिती कारवाई करणार असल्याचे समजते. (शहर प्रतिनिधी) रिपाई सेना, दलित संघटनेचा इशारा धिरज खाटीक या शिक्षकाच्या अत्याचाराला बळी पडलेली पीडीत युवती ही दलित समाजाची आहे. त्यामुळे अशा शिक्षकावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, त्याला जमानत मिळू नये यासाठी पोलीस प्रशासनाने भूमिका वठवावी व पीडीत मुलीला न्याय दयावा अशी मागणी रिपब्लिकन सेना व दलित संघटनेने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाई सेनेचे जिल्हाध्यक्ष अचल मेश्राम यांनी दिला आहे.