सतर्क राहण्याचे आवाहन
पवनी :
पवनी शहरामध्ये तीन महिलांना भूलथापा देऊन सोने पळवून नेणार्या चोरट्याचे स्केच पवनी पोलिसांनी जारी केले आहे. ३० एप्रिलला दोन चोरट्यांनी ३ महिलांना फसवून ६ तोळे सोने लुटले होते. या महिलांनी पितळी, तांब्याची भांडी व दागिने साफ करून देतो, असे सांगून चोरट्याने महिलांचे सोने घेऊन बाहेर आला. त्याचा दुसरा सहकारी बाहेर होता.
त्यानंतर हे दोघेही फरार झाले. हा प्रकार या महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पवनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. चोरट्यांना पकडण्याचा पवनी पोलिसांनी प्रयत्नकेला. परंतू, तो चोरटे त्यांच्या जाळ्यात अडकले नाहीत. महिलांनी चोरट्यांबद्दल सांगितलेल्या वर्णनावरून पवनी पोलीस विभागाने रेखाचित्र तयार केले आहे. या रेखाचित्र तयार केले असून ओठावर मिशी असणारा व नसणारा चेहरा या स्केच मधून रेखाटले आहे. हे चोरटे सराईत गुन्हेगार व असल्यामुळे यापूर्वी पवनी शहरात अनेकदा महिलांना गंडविले.
सोने चकाकी करून देणारे हे चोरटे शहर किंवा गाव बदलवत असतात. त्याठिकाणी घरी कुणी नसल्याची संधी साधून सोने लुटतात. ज्या कुणाला वरील रेखाचित्राची व्यक्ती आढळून आल्यास त्यांनी पवनी पोलीस ठाणे किंवा ठाणेदार नेवारे यांचेशी संपर्क साधावा, असे पवनी पोलीस ठाण्यातून कळविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)