शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

६० दिवसानंतरही एटीएममध्ये शंभरच्या नोटांचा तुटवडा

By admin | Updated: January 11, 2017 00:24 IST

काही खासगी बँकांच्या एटीएममध्ये आणि काही राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएम सुविधेतून शंभरची नोट गायब झाली आहे.

भंडारा : काही खासगी बँकांच्या एटीएममध्ये आणि काही राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएम सुविधेतून शंभरची नोट गायब झाली आहे. पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटाच उपलब्ध असल्याच्या सुचना लावण्यात आल्या आहेत. परिणामी शंभरच्या नोटांचा तुटवडा बाजारपेठत जाणवू लागला आहे. एकट्या भंडारा शहरात ४० पेक्षा जास्त एटीएम आहेत.बाजारपेठेत खरेदीचे व्यवहार क्रेडिट आणि डेबिट कार्डवर काही प्रमाणात सुरू असल्याचेही बोलले जात असले तरी कॅशलेस व्यवहाराबात जनजागृती अजुनही दिसुन येत नाही. अजूनही रोख पैशानेच व्यवहार करावे लागत आहे. त्यामुळे एटीएमची सुविधा अनेकांना सोयीची झाली आहे. परंतु त्याच एटीएममधून फक्त दोन हजारांच्या नोटा निघत आहेत. काही एटीएममध्ये ५०० च्या नोटा असल्यातरी सुटे नोटांसाठी नागरिक एटीएम टू एटीएम भटकत आहेत. काल रविवारचा दिवस असल्याने शहराच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. मात्र बहुतांश एटीएममध्ये फक्त ५०० व २००० च्या नोटा उपलब्ध होत्या. समोवार सकाळपर्यंत ही स्थिती अजुनच बिकट झाली. ग्रामीण भागातही अशीच स्थिती आहे. बँका उघडणार असल्या तरी सकाळ काळात एटीएममध्ये शंभर रुपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे पाचशे रुपये काढण्यासाठी अनेकांना अडचणीचे ठरले. त्याचबरोबर शंभर रुपयांच्या आतील खरेदी केल्यावर पाचशे आणि हजारच्या नोटा दिल्या तर व्यापारी सुटे पैसे मागत आहेत. त्यामुळे ग्राहकांची कुचंबणा होत आहे. ८ नोव्हेंबर रोजी रात्री ८च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर एटीएमसमोर रांगा नसल्या तरी बँका मधील रांगा ६० दिवसांनंतरही ओसरण्याची चिन्हे नाहीत. ६० दिवसांनंतर, आता व्यवहार सुरळीत होतील, या आशेने एटीएम शोधणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हातानेच माघारी परतावे लागत आहे. (प्रतिनिधी)