शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेत गौडबंगाल!

By admin | Updated: May 20, 2014 23:26 IST

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना यशस्वीरित्या राबविण्याकरीता शिक्षकांनी शिक्षण विभागाला प्रति शिक्षक १०० रुपये दिले. सुमारे ६०० शिक्षकांचे ६० हजार रुपये जमा झाले होते.

 तुमसर : सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना यशस्वीरित्या राबविण्याकरीता शिक्षकांनी शिक्षण विभागाला प्रति शिक्षक १०० रुपये दिले. सुमारे ६०० शिक्षकांचे ६० हजार रुपये जमा झाले होते. परंतु तुमसर येथील गटशिक्षणाधिकारी व्ही.आर. आदमने यांनी शिक्षण विभागात शैक्षणिक सत्र २०१३-२०१४ मध्ये केवळ ३७ हजार ५०० रुपये जमा केल्याची खळबळजनक माहिती आहे. उर्वरित रक्कम गेली कुठे? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. भंडारा जिल्हा परिषद जिल्ह्यातील इयत्ता १ ते ८ करीता सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना दरवर्षी राबविते. यात १ ते ८ चे शिक्षक आर्थिक सहकार्य करतात. तुमसर तालुक्यात या योजनेकरीता प्रति शिक्षकांकडून १०० रुपये घेण्यात आले होते. शैक्षणिक सत्र २०१३-१४ मध्ये सुमारे ६०० शिक्षकांकडून ६० हजार रुपये जमा करण्यात आले होते अशी माहिती आहे. पंचायत समिती अंतर्गत ही रक्कम जिल्हा परिषदेकडे जमा करावी लागते. या योजनेत प्रत्येक शाळेतील इयत्ता पहिलीमधील सर्वात गरीब विद्यार्थिनीला ५०० रुपये एका वर्षात एकदच दिले जातात. तुमसर तालुक्यात १ ते ७ च्या ६१ तर १ ते ४ च्या ७७ शाळा अशा एकूण १३८ शाळा आहेत. तुमसर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून शैक्षणिक सत्र २०१३-२०१४ मध्ये जिल्हा परिषद भंडाराकडे ३७ हजार ५०० रुपये जमा केले आहेत. उर्वरित सुमारे २२ हजार ५०० रुपये कुठे गेले हा संशोधनाचा विषय आहे. (तालुका प्रतिनिधी)