नागरी सुविधाचा अभाव : मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनचिचाळ : गोसीखुर्द इंदिरा सागर प्रकल्पात धरणाच्या बांधकामात व बुडीत क्षेत्रातील लोकांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता शासनाला शेती व घरे अत्यल्प मोबदल्यात बहाल केली. मात्र बाधीत प्रकल्पग्रस्तांचा पूनर्वसन करताना पूनर्वसन गावठाणात एक ना अनेक समस्याचा प्रकल्पग्रस्तांना सामना करावा लागत आहे. पुनर्वसनात १८ नागरी सुविधाची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा पवनी मार्गावर प्रकल्पग्रस्तांचा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जि.प. सदस्या पारबता डोंगरे यांनी दिला आहे.विदर्भातील महत्वाकांक्षी गोसे खुर्द इंदिरा सागर प्रकल्पाची सर्वात मोठी झळ धरणाच्या पाळीत व प्रकल्पाच्या पोटातील गोसे, मालची, पेंढरी, मेंढा, पाथरी, सौंदळ, खापरी, सावरला व नदी काठावरील गावांना त्यांचा मोठा फटका बसला आहे. संबंधित ग्रामवासीयांनी प्रकल्पासाठी कोणताही मागचा पुढचा विचार न करता अत्यल्प मोबदल्यात शासनाला शेती व घरे बहाल केले. मात्र पुनर्वसन करताना शासनाने भौतिक सुविधा उपलब्ध करून न देता खोटे आश्वासने देवून गावे रिकामी केले. बाधीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना रोजगार नाही. उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सुशिक्षित बेरोजगार रोजगारासाठी वणवण भटकत आहेत. गोसे प्रकल्पाच्या पाण्यापासून लाभ क्षेत्रातील शेतकरी श्रीमंत होतील तर धरणाच्या कामासाठी शेती व घरे देणारे उपवासाने मरत आहेत.सौंदळ, खापरी, पुनर्वसनात समस्यांचा अंबार असून कुसूम श्रीराम शेंडे या विधवेला पुनर्वसनात भुखंड मिळाला नाही ही विधवा कुटूंबासह सभा मंडपात वास्तव्य करीत आहे, मोतीराम किसन मेश्राम, विठ्ठल वातू मेश्राम व बाबूराव लक्ष्मण मारबते यांना घरकुलाचा मोबदला देण्यात आला नाही तर विष्णू कारू भुरे यांना भूमिहिन पॅकेज मिळाला नाही. दयावती जनार्धन रामटेके यांना मोबदला मिळाला नाही. शासनाने पुनर्वसनात तात्काळ पूर्तता करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या पारबती डोंगरे यांनी केली आहे. यावेळी उपसरपंच विजय निंबार्ते, भूमिका दिलीप भुरे, मधुकर मेश्राम, रविंद्र रामटेके, गुणराम केवट आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
सौंदड, खापरी पुनर्वसनाचे काम दुर्लक्षित
By admin | Updated: September 26, 2015 00:37 IST