शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यात सत्याग्रह आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 23:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या समर्थनार्थ शनिवारी जिल्हाधिकारी चौकात एक दिवसीय उपोषण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.सत्याग्रह आंदोलन प्रसंगी धर्माचार्य प्रमुख हभप श्याम महाराज हटवार, गहाणे महाराज तसेच कलाम शेख यांनी संबोधित केले. अयोध्या येथे भव्य राम मंदिराचे निर्माण करण्यासाठी संसदेत कायदा ...

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या समर्थनार्थ शनिवारी जिल्हाधिकारी चौकात एक दिवसीय उपोषण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.सत्याग्रह आंदोलन प्रसंगी धर्माचार्य प्रमुख हभप श्याम महाराज हटवार, गहाणे महाराज तसेच कलाम शेख यांनी संबोधित केले. अयोध्या येथे भव्य राम मंदिराचे निर्माण करण्यासाठी संसदेत कायदा तयार करणे, समान नागरी कायदा लागू करणे, संपूर्ण गौहत्या बंदी कायदा संसदेत लागू करणे, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग शिफारसी लागू करणे, बांगलादेशी व रोहिग्यांना घुसखोरी करणाऱ्यांना देशातून बाहेर काढणे, देशातील कॉन्ट्रॅक्ट लेबर सिस्टीम बंद करणे व कामगारांचे रक्षण करणे, स्वस्त व गुणवत्तायुक्त शिक्षण प्रणालीचा अवलंब करणे इत्यादी मागण्या घेऊन डॉ.प्रविण तोगडीया यांनी देशव्यापी धरणे आंदोलनाचे आवाहन केले होते.त्या समर्थनार्थ शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणा सत्याग्रहाचे आयोजन केले होते.यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने भंडारा जिल्हा सचिव उपाध्यक्ष विकास मदनकर, मयूर गौतम, प्रा.देवेश नवखरे, सिनेट सदस्य प्रविण उदापुरे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, पन्ना सार्वे, आशुतोष मिश्रा, विनोद गायधने, दिपक मेंढे, मनिष बिच्छवे, विनोद थोटे, हर्षल जावळकर, पंचायत समिती सदस्य दर्शन भोंदे, विश्वजीत घरडे, राजेश मेश्राम, रोशन ठवकर, विनायक मुंगमोडे, संजय मते, शाम सालटकर, शिवसेनेचे शिवा भंडारी, शैलेश श्रीवास्तव, राकेश आंबोने, संजय पटले, प्रविण हेडाऊ किरण चवळे, बालू ठवरकर, संदीप खराबे, अमीत बारस्कर, मयूर बिसेन, विनोद राखडे, संजय मते, अतुल मानकर, प्यारेलाल ईलमे, विक्की खराबे, मनोज चावरे व मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांना या मागण्यांचे निवेदन देवून सत्याग्रह आंदोलनाची सांगता करण्यात आली.