शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी सत्याग्रह आंदोलन

By admin | Updated: June 22, 2014 23:57 IST

दोन वेळा पिण्याचे पाणी देण्याचे आणि भंडारा शहराच्या सर्वांगीण विकासाच्या १९ मुद्यांचे येत्या बुधवारपर्यंत लिखीत उत्तर देण्याचे आश्वासन सत्याग्रह आंदोलनाच्या अनुषंगाने नगराध्यक्ष वर्षा धुर्वे यांनी

भंडारा : दोन वेळा पिण्याचे पाणी देण्याचे आणि भंडारा शहराच्या सर्वांगीण विकासाच्या १९ मुद्यांचे येत्या बुधवारपर्यंत लिखीत उत्तर देण्याचे आश्वासन सत्याग्रह आंदोलनाच्या अनुषंगाने नगराध्यक्ष वर्षा धुर्वे यांनी नगरसेवक हिवराज उके व शिष्टमंडळाला चर्चेदरम्यान दिले.भंडारा नगर परिषदेसमोर नगरसेवक हिवराज उके यांच्या नेतृत्वात शहर सुधार समितीचे अध्यक्ष भैय्याजी साकुरे महाराज, सदानंद इलमे, माणिकराव कुकडकर, आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णा ठवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन वेळा पिण्याचे पाणी, सुजल निर्मल योजना, साफसफाई व घनकचऱ्याचे योग्य नियोजन, विद्युत पुरवठ्याची समस्या, शहर विकास आराखडा, विकास पुस्तिका, रोड, नाला, नाल्या, त्यावर स्लॅब, फेरीवाला धोरण, तलावाचे संरक्षण व सौंदर्यीकरण, चौरस्त्याचा विकास व सौंदर्यीकरण, प्रसाधन गृहे, घाटाचे बांधकाम, घरकुल योजना आदी १९ मागण्यांसाठी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. संबंधित विभागाशी चर्चा करुन बुधवारपर्यंत लिखीत उत्तर देण्याचे अध्यक्षांनी मान्य केले. यावर नगरसेवक हिवराज उके म्हणाले, सर्व १९ मागण्यांचे लिखीत उत्तर न मिळाल्यास व समाधान न झाल्यास १५ दिवसानंतर आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल. शिष्टमंडळाशी चर्चेच्यावेळी धर्मेंद्र साखरकर, प्रदीप पटेल, बोंद्रे, नगरसेवक हिवराज उके, भैय्याजी साकुरे, सदानंद इलमे, झुलनबाई नंदागवळी, ज्ञानेश्वर बोळखे, सुनंदा तईकर, मोहनलाल तईकर, विना नागदेवे, हेमलता वंजारी, माधुरी वाघमारे, गीता नागपूरे, पुष्पा तिघरे, बबलू साकुरे, कृष्णा ठवकर यांची उपस्थिती होती.(वार्ताहर)