शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

साकोलीची भूमेश्वरी गहाणे जिल्ह्यात अव्वल

By admin | Updated: May 26, 2016 01:30 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता आॅनलाईनद्वारे बारावीचा निकाल घोषित केला.

निकाल ८८.३५ टक्के : लाखनी आघाडीवर तर लाखांदूर पिछाडीवरभंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता आॅनलाईनद्वारे बारावीचा निकाल घोषित केला. यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ८८.३५ टक्के इतका लागला. साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयाची भूमेश्वरी केशव गहाणे ही विद्यार्थिनी ९२.३० टक्के (६०० गुण) घेऊन जिल्ह्यातून प्रथम आली आहे. यावर्षीच्याही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.भंडारा येथील नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी केतकी संजय पदवाड आणि जे.एम. पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी राज रोशन कटकवार यांनी ९१.८४ टक्के (५९७ गुण) घेऊन जिल्ह्यातून संयुक्तपणे द्वितीय आले आहे. लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची रक्षंदा कोल्हेकर हिला ९१.६५ टक्के (५९६ गुण) घेऊन तृतीय आली आहे. बारावीच्या निकालात भंडारा जिल्हा नागपूर विभागात दुसऱ्या स्थानावर आहे. यावर्षीही मुलींनी बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.३१ इतकी असून मुलांची टक्केवारी ८५.८६ इतकी आहे. जे.एम. पटेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी सरगम चंद्रकांत ठाकरे हिला ९१.५३ टक्के, नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या रमेश गहेरवार हिला ९०.९२ टक्के (५९१ गुण) प्राप्त केले. बुधवारला दुपारपर्यंत नूतन कन्या विद्यालयाची केतकी पदवाड व जे.एम. पटेल महाविद्यालयाचा राज कटकवार हे दोघे संयुक्तपणे अव्वल असल्याचे वाटत असतानाच सायंकाळी साकोलीची भुमेश्वरी गहाणे या विद्यार्थिनी अव्वल असल्याचे माहिती मिळाली. त्यानंतर भूमेश्वरीशी संपर्क साधला असता तिने वैद्यकीय शाखेत करीअर करायचे असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)श्रेणीनिहाय निकालयावर्षी जिल्ह्यातून १६ हजार १७८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १६ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १४ हजार २८८ विद्यार्थी ऊतीर्ण झाले. विद्यार्थ्यांमध्ये ६ हजार ६६९ मुले तर ७ हजार ६१९ मुलींचा समावेश आहे. यात ५३२ विद्यार्थी प्राविण्यप्राप्त ठरले. ३,९०६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९,१८४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.शाखानिहाय निकालजिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९५.९६ टक्के, कला शाखेचा निकाल ८१.५० टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९३.७३ टक्के तर एमसीव्हीसी शाखेचा निकाल ८९.७१ टक्के लागला आहे. शाखानिहाय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेचे ६,२९१ विद्यार्थी, कला शाखेचे ६,६२९ विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे ८९७ तर एमसीव्हीसी शाखेचे ४७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लाखनी तालुका अव्वलभंडारा जिल्ह्याचा निकाल ८८.३५ टक्के लागला असून जिल्ह्यातील सातही तालुक्यातून लाखनी तालुका विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत आघाडीवर आहे. लाखांदूर तालुक्याचा निकाल पिछाडीवर आहे. यात लाखनीची टक्केवारी ९३.०७, भंडारा ८९.५९, पवनी ८८.७२, साकोली ९२.२१, तुमसर ९०.३२, मोहाडी ७९.९१ तर लाखांदूर तालुक्याची टक्केवारी ७९.१९ इतकी आहे. सातही तालुक्यातून मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८५.७३ असून मुलींची टक्केवारी ९०.७८ आहे. तालुकानिहाय ऊत्तीर्ण विद्यार्थी१४ हजार २८८ उतीर्ण विद्यार्थ्यांमध्ये भंडारा तालुक्यातून ४,३०२ पैकी ३,८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लाखांदूर तालुक्यातून १,२५९ पैकी ९९७ विद्यार्थी, लाखनी तालुक्यातून २,०५० पैकी १,९०८ विद्यार्थी, मोहाडी तालुक्यातून २,०२१ पैकी १,६१५ विद्यार्थी, पवनी तालुक्यातून १,९५१ पैकी १,७३१ विद्यार्थी, साकोली तालुक्यातून २,०१६ पैकी १,८५९ विद्यार्थी, तुमसर तालुक्यातून २,५७३ पैकी २,३२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात सात शाळा १०० टक्केयंदाच्या १२ वी परीक्षेत जिल्ह्यातील सात शाळांनी निकालाच्या टक्केवारीत शंभरी गाठली आहे. यात भंडारा तालुक्यातून २, लाखनी २ तर मोहाडी, पवनी व तुमसर येथील एका शाळेचा समावेश आहे.