शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

साडीच्या पदराने केला महिलेचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 22:52 IST

दूचाकीने नागपूरकडे परत जात असतांना साडीचा पदर टायरमध्ये फसला. यात महिला दूचाकीवरुन डोक्याच्या भारावर रस्त्यावर कोसळली. यातच तिचा जागीच मृत्यू झाला. प्रिती अनिरुध्द दहिवले (३६) रा. नागपूर असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास कारधा नवीन पुलाजवळ घडली.

ठळक मुद्देमुलांचे मातृत्व हिरावले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दूचाकीने नागपूरकडे परत जात असतांना साडीचा पदर टायरमध्ये फसला. यात महिला दूचाकीवरुन डोक्याच्या भारावर रस्त्यावर कोसळली. यातच तिचा जागीच मृत्यू झाला. प्रिती अनिरुध्द दहिवले (३६) रा. नागपूर असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास कारधा नवीन पुलाजवळ घडली.प्रिती ही पाच वर्षांनंतर लाखनी येथे माहेरी आली होती. अनिरुध्द दहिवले हे आपल्या दुचाकीने पत्नी व तिन मुलांसह लाखनीला सासुरवाडीला आले होते. दुचाकीने जात असताना वैनगंगा नदीवरील नविन पुलाजवळ प्रिती यांचा साडीचा पदर लोंबकळत असल्याने तो दूचाकीच्या मागील चाकामध्ये गुंडाळला गेला. यात ती डोक्याच्या भारावर रस्त्यावर कोसळली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली.दहिवले दाम्पत्याला तीन मुल आहेत. यापैकी दोन मुली व एक मुलगा आहे. सर्वात लहान मुलगा असून तो पावणे दोन वर्षांचा आहे. क्षणार्धात घडलेल्या या घटनेमुळे या तिन्ही मुलांवरील आईचे छत्र हरपले आहे. छोटीशी चुक जिवावर कशी बेतू शकते याचेच हे बोलके व तेवढीच मार्मिक ही घटना ठरली.