शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सारडा विद्यालयाचा विज्योत सिल्लारे जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2022 05:00 IST

सावित्रीदेवी शिवनारायण सारडा महिला समाज विद्यालयाने यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली असून या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. दहावीतून जिल्ह्यात अव्वल ठरलेल्या विज्योतला अभियंता व्हायचे आहे. बारावीनंतर त्याला एरोनॉरटिकल किंवा मरीन इंजिनियरिंगमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्यादृष्टीने त्याने अभ्यासालाही सुरुवात केली आहे. त्याचे वडील गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात तर आई भंडारा येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दहावीच्या परीक्षेत येथील सावित्रीदेवी शिवनारायण सारडा महिला समाज विद्यालयाचा विद्यार्थी विज्योत विजय सिल्लारे हा जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. त्याला बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८१ गुण मिळाले मिळाले आहे. तर प्राईड कॉन्व्हेंटची अमिषा प्रमोद बेदपुरीया आणि मोहाडी येथील अनिमेश कैलास गभने बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८० गुण घेवून जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. सावित्रीदेवी शिवनारायण सारडा महिला समाज विद्यालयाने यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली असून या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. दहावीतून जिल्ह्यात अव्वल ठरलेल्या विज्योतला अभियंता व्हायचे आहे. बारावीनंतर त्याला एरोनॉरटिकल किंवा मरीन इंजिनियरिंगमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्यादृष्टीने त्याने अभ्यासालाही सुरुवात केली आहे. त्याचे वडील गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात तर आई भंडारा येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. शिक्षणाचा वसा त्याला घरातूनच लाभला आहे. खासगी शिकवणीसोबतच त्याला मुख्याध्यापिका वैशाली धारस्कर यांच्यासह शिक्षकांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या अध्यक्ष डॉ. विशाखा गुप्ते, सचिव नूतन मोघे यांनी त्याचे कौतुक केले. भंडारा येथील प्राईड कॉन्व्हेंटची विद्यार्थीनी अमिषा प्रमोद बेदपुरीया जिल्ह्यात द्वितीय आली आहे. तिला बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८० गुण मिळाले आहे. आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका प्रियंका रिनके यांना देत आहे. संस्थेचे संस्थापक राजेश काटगरे यांनी त्याचे कौतुक केले आहे. तर मोहाडी येथील सुदामा विद्यालयाचा विद्यार्थी अनिमेश कैलास गभने याला बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८० गुण मिळाले आहे. त्याचे वडील शेतकरी असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने घवघवीत यश मिळविल्याने कौतुक होत आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. शाळांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांचा सत्कार करण्यात    आला. 

 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल