शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

जलयुक्त शिवार अभियान गावासाठी संजीवनी

By admin | Updated: May 4, 2015 00:41 IST

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील तलावाचे खोलीकरण करून गाळ उपसा करण्यात येईल.

सिरसी येथे उद्घाटन सोहळा : वंदना वंजारी यांचे प्रतिपादन वरठी : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील तलावाचे खोलीकरण करून गाळ उपसा करण्यात येईल. यामुळे तलावात पाणी साठवून राहील. गाळ उपसादरम्यान निघणारी माती रस्ते व शेतात उपयोगी येईल. गावाची पाण्याची पातळी वाढेल. शेतीकरिता पाणी उपलब्ध होईल. गावातील मजुरांना काम मिळेल. तलावात मासे उत्पादन केल्यास ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढेल. गुराढोरांना उन्हाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध होऊन बारमाही पाणी टंचाई भासणार नाही. जलयुक्त शिवार अभियान हे गावासाठी संजीवनी ठरणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी यांनी केले.जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात आले. उद्घाटन आमदार रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, सभापती अरविंद भालाधरे, सरपंच संजय वासनिक, उपसरपंच रविंद्र वंजारी, सदस्य सुमित्रा सोनटक्के, तारा वाघमारे, दुगा मदनकर उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत शासनाचे उद्देश व धोरण समजावून सांगितले. यावेळी असर फाउंडेशन विक्रम फडके, वैभव कोलते यांच्या चमूने जनजागरण पथनाट्य सादर केले. संचालन संतोष कारोमोरे, प्रस्ताविक संजय वासनिक व आभार ग्रामसेवक धुर्वे यांनी मानले. कार्यक्रमात शाखा अभियंता एकापुरे, बोरकर, शोभा बारई, कुंडलीक मदनकर, लिला मदनकर, हलमारे, मस्के व उषा वाघमारे उपस्थित होते. (वार्ताहर)पाणी हे निसर्गाचे अमुल्य देणं आहे. पण निसर्गाचा हा अमुल्य ठेवा मानवी प्रवृत्तीमुळे कमी होत आहे. जमिनीच्या पोटातून उपसा होणारे पाणी जमिनीत जीरत नाही. असेच सुरु राहिले तर एक दिवस सभोवताल पाण्यासाठी घरांघरात, गावांगावात युद्ध होईल. पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम सुरु करण्यासह पाण्याचा दुरुपयोग करू नका.अ‍ॅड.रामचंद्र अवसरे आमदार, भंडारा विधानसभा क्षेत्र