शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सेनेची भाजपावर कुरघोडी!

By admin | Updated: September 13, 2015 00:33 IST

राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री असलेले भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना ...

भाजपचा आक्षेप : संजय गांधी निराधार समिती जाहीरभंडारा : राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री असलेले भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती सात सप्टेंबर रोजी नियुक्त केली. तालुकानिहाय सात सदस्यीय समितीत शिवसेनेने भाजपावर कुरघोडी केली आहे. या समितीतील नियुक्त सदस्यांची नावे बाहेर येताच भाजपने आक्षेप नोंदविला आहे. आता ही समिती रद्द होते की ती यादीच कायम राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी आणि भंडारा तालुक्याची संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती नियुक्त करणारे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातून पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. त्यानंतर हे पत्र भाजप कार्यकर्त्यांच्या हातात पडताच नाराजी सूर उमटला आहे. हे पत्रच सोशल मिडीयाच्या ‘वॉटसअप’वर टाकण्यात आले. जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार असताना शिवसेनेची चलती कशी? सेनेचा एकही आमदार नसताना भाजपचे लोकप्रतिनिधी काय करतात? आम्ही आयुष्यभर चटयाच उचलायच्या का? असे संदेश फिरु लागले. त्यानंतर त्याची दखल घेत खासदार नाना पटोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून यादीवर आक्षेप नोंदविला आहे. पवनी तालुक्यात सात सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी सेनेचे विजय काटेखाये तर सदस्यांमध्ये सेनेचे नरेश बावनकर, प्रमोद मेंढे, बाळकृष्ण फुलबांधे, तुलशी वंजारी तर भाजपचे डॉ.संदीप खंगार व कुंदा तलमले यांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यात समितीच्या अध्यक्षपदी सेनेचे अनिल गायधने तर सदस्यांमध्ये सेनेचे अरुण भेदे, प्रकाश पारधी, नीता चोपकर, वष्णु दहीवले तर भाजपचे विनोद बांते व प्रशांत खोब्रागडे यांचा समावेश आहे. युतीचे सरकार असल्यामुळे अशासकीय समितीत समान वाटा असावा, असला तर कार्यकर्त्यांचा सन्मान होईल, असे वाटत होते. परंतु भाजपला डावलल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा स्वपक्षातीलच लोकप्रतिनिधींवर प्रश्नांचा भडीमार करीत आहेत. त्यांना उत्तरे देताना लोकप्रतिनिधींची दमछाक होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)