रंजित चिंचखेडे - चुल्हाड सिहोरा परिसरातील बावनथडी नदीवर साकारण्यात आलेल्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात सध्यास्थित ठिकठाक नसतानाही संबंधित विभागाने उपाययोजना करण्यास अद्याप गती दिली नाही. यामुळे यंदा पाण्याचा उपसा थांबणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे पाण्याअभावी ११ हजार हेक्टर जागेतील धान उत्पादन प्रभावित होणार आहे.सिहोरा परिसरात शेतकर्यांना सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. ६0 कोटी खर्चून साकारण्यात आलेला हा प्रकल्प पाण्याचा उपसा विस्तीर्ण चांदपूर जलाशयात करीत आहे. या जलाशयात पाण्याची साठवणूक पावसाळ्यात करण्यात येत असल्याने, याच कालावधीत प्रकल्प सुरू ठेवण्यात येत आहे. दरम्यान या प्रकल्पात सध्यास्थित अच्छे दिन नसल्याने येत्या काही दिवसात नवा संकट निर्माण होणार आहे. या प्रकल्पाला कवलेवाडा येथून वीज पुरवठा करण्यात येत आहे. हा पुरवठा आजही सुरू आहे. परंतु प्रकल्प स्थळात ठिक ठाक नाही. पंप गृहाला विज पुरवठा करणार्या ५५ बॅटरी नादुरूस्त आहेत. अनेक बॅटरी भंगारात निघाल्या असल्याने विज पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. प्रती बॅटरी २00 वॅटची असून ११ हजार वॅट विज पुरवठा अडचणीत येणार आहे.पंपगृह सुरू करण्यासाठी या बॅटरी महत्वपूर्ण आहेत. परंतु सध्या स्थित या बॅटरी दुरूस्त करण्यासाठी उपसा सिंचन विभागामार्फत उपाययोजना करण्यास सुरूवात करण्यात आली नाही. या प्रकल्प स्थळात विजेचे बोर्ड जळून खाक झाली आहे. संपूर्ण प्रकल्प स्थळात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कोट्यवधीची योजना अंधारात असल्याने योजनाच गुंडाळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकल्प स्थळात पंपगृह आहे. या पंपगृहापैकी ५ पंपगृह बंद आहे. चार पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. सुरू असलेले पंपगृह नादुरूस्त असल्याने हे शेवटच्या घटका मोजत आहेत.या पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यासाठी नदी पात्रात टाकी तयार करण्यात आली आहे. या टाकीला सम असे नाव आहे. पावसाळ्यात या टाकीत साठवणुक होणारे पाणी उपसा करण्यात येत आहे. परंतु टाकीत रेती आणि मातीमिश्रीत गाळ तयार झाली आहे. पाण्याच्या प्रवाहाने ही गाळ टाकीत असल्याने पंपगृह पाण्याचा उपसा करताना दम टाकत आहेत. पाण्याच्या प्रवाहात ही गाळ उपसा होत असून उपकरणावर मोठे संकट निर्माण झाले आहे. या टाकीत गाळ काढण्याची प्रक्रिया वार्षिक नियोजन बद्ध आहे. दरवर्षी गाळ काढण्याचा कृती आराखडा आहे. परंतु गेल्या तीन-चार वर्षापासून टाकीतील गाळ काढण्यात आली नाही. यामुळे यंत्रणात धाकधुकी सुरू झाली आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात यंदा बेजबाबदारपणा असल्याने पाण्याचा उपसा होणार किंवा नाही, असा सवाल आहे. दरम्यान या प्रकल्पाला गेल्या वर्षभरापासून वरिष्ठ अधिकारी भेट देत आहे.प्रकल्पस्थळात उणिवा असल्याची नोंद करीत आहेत. परंतु या उणिवा भरून काढण्यासाठी उपाययोजना होत नाही. दरम्यान पंपगृहात पाण्याचा उपसा सुरू असताना संकट टाळण्यासाठी टँकर तयार करण्यात आली आहेत. पंपगृह अचानक बंद पडल्यास योजनेला आधार देत आहे. संकुलातून मार्ग काढणारी योजना बंद पडली आहेत. यामुळे संकटातच प्रकल्प आणि कार्यरत यंत्रणा आली आहे. दरम्यान नदी पात्रातून पाण्याचा उपसा करण्यास तीन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. या कालवधीपर्यंत उपसा सिंचन प्रकल्पात असलेल्या समस्या निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती सुत्रानी दिली आहे. परंतु निधीअभावी हे संकट वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पात बिघाड असल्याच्या चर्चेने सिहोरा परिसरातील शेतकर्यांचे चेहरे हिरमुसले आहे. येत्या खरीप हंगामात नवे संकट येणार असल्याची चर्चा आहे.
सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात पाण्याचा उपसा थांबणार!
By admin | Updated: June 9, 2014 23:27 IST