देवानंद नंदेश्वर।आॅनलाईन लोकमतभंडारा : अठराविश्व दारिद्र्यातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न पूर्ण करताना अनेक अडचणींना सामोरे जात भंडारा तालुक्यातील दिघोरी (आमगाव) येथील महालक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्ष संध्या राजुजी ठवकर यांनी गटाच्या मार्फत कर्ज घेऊन कापड व्यवसायातून सर्वच सदस्यांना जीवन संगीत निर्माण केले.बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आपला व कुटुंबाचा आर्थिक विकास कसा करता येईल, याचा महालक्ष्मी बचत गटाने आदर्श निर्माण केला आहेपूर्वी संध्या यांची परिस्थिती खूप हलाखीची होती. त्यांना दोन मुले आहेत. ते लहान असल्यामुळे कामासाठी त्या बाहेर जाऊ शकत नव्हत्या. पती आॅटो चालक आहेत. कामाच्या मोबदल्यात त्यांना जे काही पैसे मिळायचे त्यातूनच घरखर्च चालत असे. मुल मोठे होत असल्यामुळे आमचे कसे होईल, असाच विचार संध्या यांच्या मनात येत असे. दरम्यान गावात किती महिला गटात आहे व किती नाहीत, याचा महिला आर्थिक विकास महामंडळ कडून सर्वे सुरू होता. त्या सर्वे करीत संध्या यांच्या घरी गेल्या. त्यांना संपूर्ण माहिती सांगितली. गटात नसल्याचे कळल्यावर त्यांना गटात राहण्याचा सल्ला दिला. गटाकडून त्यांना जिज्ञासा मिळाली. त्यानंतर संध्याला गटात राहण्याची परवानगी मिळताच त्या गटात आल्या. त्यांच्या महालक्ष्मी बचत गटाला अंतर्गत कर्ज व्यवहार सुरू झाला. कापड व्यवसायासाठी आयसीआयसीआय बँकेकडून ८० हजार रूपयांचे कर्ज घेतले. मनात जिद्द असल्याने त्यांना या व्यवसायातून आर्थिक विकास होऊ लागला. त्यानंतर पुन्हा आयसीआयसीआय बँकेकडून दोन लाख रूपयांचे कर्ज घेतले. आज संध्याकडे कापडाचा मोठा व्यवसाय उभा झाला असून यातून बचत गट व महिलांना भरभराटी प्राप्त होत आहे. संध्या आता खूप आनंदी आहेत. बचत गटाच्या माध्यमातून त्या आपल्या हलाखीच्या परिस्थितीमधून वर आल्या आहेत.
‘संध्या’ने केला कापड व्यवसायातून विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 22:14 IST
अठराविश्व दारिद्र्यातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न पूर्ण करताना अनेक अडचणींना सामोरे जात भंडारा तालुक्यातील दिघोरी (आमगाव) येथील महालक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्ष संध्या राजुजी ठवकर यांनी गटाच्या मार्फत कर्ज घेऊन कापड व्यवसायातून सर्वच सदस्यांना जीवन संगीत निर्माण केले.
‘संध्या’ने केला कापड व्यवसायातून विकास
ठळक मुद्देमहालक्ष्मी बचत गट: अनेक महिलांसमक्ष ठेवला आदर्श