शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांनी रोखले रेतीचे ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 05:00 IST

नदीघाटावरील रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याला प्रशासनाची रितसर मान्यता आहे. परंतु क्षमतेपेक्षा जास्त रेती ट्रकमध्ये भरली जाते. त्यामुळे गावातून जाणाऱ्या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. गावकऱ्यांना या रस्त्यातून जाताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. याबाबत वारंवार तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. दरम्यान शुक्रवारी ग्रामस्थांनी रेतीचे ट्रक अडविले. ट्रकची मोठी रांग लागली होती.

ठळक मुद्देसुकळी येथील प्रकार : अवजड वाहतुकीने रस्त्यांवर खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. वारंवार विनंती करूनही या वाहतुकीला प्रतिबंध घातला जात नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या तुमसर तालुक्यातील सुकळी येथील नागरिकांनी शुक्रवारी रेतीचे ट्रक अडविले. या प्रकाराची माहिती होताच पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.सुकळी (दे.) गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. नदीघाटावरील रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याला प्रशासनाची रितसर मान्यता आहे. परंतु क्षमतेपेक्षा जास्त रेती ट्रकमध्ये भरली जाते. त्यामुळे गावातून जाणाऱ्या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. गावकºयांना या रस्त्यातून जाताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. याबाबत वारंवार तक्रारी करूनही उपयोग झाला नाही.दरम्यान शुक्रवारी ग्रामस्थांनी रेतीचे ट्रक अडविले. ट्रकची मोठी रांग लागली होती. या प्रकाराची माहिती होताच महसूल व पोलीस विभागातीम कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी क्षमतेपेक्षा अधिक वाहतुकीमुळेच रस्ता खड्डेमय झाल्याचा आरोप सरपंच भाऊलाल बांडेबुचे यांनी केला.गत काही दिवसांपासून रेतीची उचल वाहतूक सुरू आहे. परंतु ग्रामपंचायतीला साधे पत्र दिले नाही. याबाबत ग्रामपंचायत अनिभिज्ञ आहे. रेती वाहतुकीमुळे ग्रामस्थात तीव्र रोष असून भरधाव वाहतुकीमुळे अपघाताची भीती नाकारता येत नाही.सर्वसामान्य नागरिकांनी घाटातून रेती काढली तर कारवाई करण्यात येते. क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहतूक सुरू असूनही प्रशासन कारवाई करीत नाही.-भाऊलाल बांडेबुचे, सरपंच सुकळी.

टॅग्स :sandवाळू