शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

माेहाडी तालुक्यात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रेती तस्करी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 05:00 IST

मोहाडी तालुक्यात वैनगंगा नदीच्या सुकळी, रोहा, बेटाळा आणि सूर नदीच्या नेरी घाटासह अनेक घाटावरून रेतीची तस्करी सुरू आहे. वैनगंगेच्या रेतीला सोन्यासारखा भाव नागपूर क्षेत्रात मिळतो, या रेतीला मोठी मागणी आहे. त्यामुळे रेती तस्कर साम, दाम, दंड, भेद वापरून रेतीची तस्करी करतात. बेटाळा रेतीघाटाचा लिलाव झाल्याने सीमांकनाबाहेरून रेतीचा उपसा जोमात सुरू आहे. निलज बुज. व देव्हाडा हे दोन घाट रेती चोरांसाठी वरदान ठरलेले आहेत. 

ठळक मुद्देवैनगंगा नदी : सुकळी, रोहा, बेटाळा व सूर घाटांवर धुमाकूळ

सिराज शेखलाेकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या घाटावरून अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत रेती तस्करी होत आहे. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असून, तस्करी आणि अधिकारी मालामाल होत आहेत. मोहाडी येथील कुशारी फाटा येथून दररोज रेतीच्या वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र, कारवाई केली जात नाही. मोहाडी तालुक्यात वैनगंगा नदीच्या सुकळी, रोहा, बेटाळा आणि सूर नदीच्या नेरी घाटासह अनेक घाटावरून रेतीची तस्करी सुरू आहे. वैनगंगेच्या रेतीला सोन्यासारखा भाव नागपूर क्षेत्रात मिळतो, या रेतीला मोठी मागणी आहे. त्यामुळे रेती तस्कर साम, दाम, दंड, भेद वापरून रेतीची तस्करी करतात. बेटाळा रेतीघाटाचा लिलाव झाल्याने सीमांकनाबाहेरून रेतीचा उपसा जोमात सुरू आहे. निलज बुज. व देव्हाडा हे दोन घाट रेती चोरांसाठी वरदान ठरलेले आहेत. देव्हाडा घाटातून दररोज पहाटेपासून सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत १० ते १२ ट्रॅक्टरद्वारे रेती नदी काठावर आणण्यात येते. नंतर जेसीबीने टिप्पर भरून तिरोडा, नागपूर, रामटेककडे पाठविली जाते. हीच स्थिती निलज बुज. घाटावर आहे. यासाठी रेती तस्करांकडून टिप्पर व ट्रॅक्टरच्या संख्येनुसार महसूल अधिकाऱ्यांना व पोलिसांना हाताशी धरण्यात येते. त्यामुळे महसूल व पोलीस अधिकारी या रेती तस्करांवर कारवाई करीत नाहीत. एखाद वेळी गावकऱ्यांनी तक्रार केलीच तर त्याची सूचना रेती तस्करांना देऊन नंतर धाड टाकली जाते. त्यामुळे एकही टिप्पर अथवा ट्रॅक्टर हाती लागत नाही. मात्र, जे अर्थपूर्ण व्यवहार करीत नाही त्यांचे ट्रॅक्टर जप्त केले जाते.  दुसरीकडे रेतीच्या टिप्परमुळे चांगले रस्ते उखडले आहेत. धुळीमुळे पिकांचे नुकसान होत आहे. 

रेती तस्करांकडून एन्ट्री फीरेतीच्या या गोरखधंद्यात रेती तस्करांसोबत तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, बीट जमादार, स्थानिक गुन्हे शाखा व खनिकर्म विभाग या सर्वांचे उखळ पांढरे होत आहे. त्यामुळे सर्वांनी बघ्याची भूमिका घेतलेली आहे. रेती तस्करीची सूचना दिल्यावरही कारवाई केली जात नाही अशी काही गावकऱ्यांची तक्रार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तरी यावर अंकुश आणण्यासाठी प्रयत्न करावा, अशी  मागणी होत आहे.

 

टॅग्स :sandवाळू