शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

रेतीचे ढिगारे जेसीबीने भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:19 IST

‘रस्ता बनला रेतीचा डम्पींग यार्ड’ या आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच महसूल प्रशासन खळबळून जागे झाले.

ठळक मुद्देमहसूल प्रशासनाची कारवाई : पंचनामा करून रेती जप्तीची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ‘रस्ता बनला रेतीचा डम्पींग यार्ड’ या आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच महसूल प्रशासन खळबळून जागे झाले. १५० ते २०० ब्रास रेतीचा साठा तहसीलदारांच्या निर्देशानुसार जेसीबीच्या सहाय्याने रस्ता भुईसपाट करण्यात आला. शासन नियमानुसार महसूल प्रशासनाने रेती साठ्याचा पंचनामा करून रेतीची उचल करणे आवश्यक होते. परंतु रेतीचे ढिगारे भूईसपाट करण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने कां घेतला हे कळले नाही.डोंगरला-नवरगाव रस्त्यावर सुमारे १५० ते २०० ब्रास रेतीचा अवैध साठा करण्यात आला होता. तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या संगनमताने हा गोरखधंदा सुरू होता. डोंगरला गावातही ठिकठिकाणी रेतीचे अवैध साठे अजूनही पडून आहेत. बुधवारी लोकमतने ‘रस्ता बनला रेतीचा डम्पींग यार्ड’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाली. त्यानंतर महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास डोंगरला-नवरगाव रस्त्यावर ८ ते १० तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार तथा तहसीलदार दाखल झाले. डोंगरला येथील जेसीबी घेऊन सर्व रेतीसाठा भुईसपाट करून रस्त्यावर ती पसरविण्यात आली.अवैध गौण खनिजामध्ये रेतीचा समावेश होता. रेती ही मौल्यवान आहे. रेती अवैधरीत्या रेती घाटातून आणून रस्त्याच्या शेजारी डम्पिंग करून ठेवण्यात आली. नियमानुसार १५० ते २०० ब्रास रेतीचा पंचनामा करून ती जप्त करून रेतीची उचल करणे गरजेचे होती. ती भुईसपाट कां करण्यात आली. ही कारवाई करण्यापूर्वी उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकाºयांची परवानगी घेण्यात आली होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तामसवाडी व पांजरा रेतीघाटातून ही रेती अवैधरीत्या उत्खनन करण्यात आली. राजरोसपणे ती रस्त्याच्या शेजारी साठा करण्यात आला. तेव्हा मंडळ अधिकारी, तलाठी यांनी कर्तव्य पार पाडले नाही. जिथे रेती साठा केला होता ती जागा वनविभागाची असल्याची माहिती आहे. डोंगरला गावातील रेती साठ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. महसूल प्रशासनाचे येथे दुर्लक्ष आहे. दरम्यान डोंगरला येथील पोलीस पाटील किसनलाल पटेल यांना काही रेती माफियांनी मारण्याची धमकी दिली, अशी माहिती आहे. गुरूवारी सायंकाळी ६ वाजता ग्रामपंचायत मधील परिचर खेमराज शरणागत याला रेतीमाफियांनी मारहाण केली. त्या प्रकरणाची तक्रार शरणागत यांनी तुमसर पोलिसात नोंदविण्याकरिता सायंकाळी गेले. डोंगरला गावात तणावाचे वातावरण आहे. महसूल प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती तर आरोप प्रत्यारोपाची वेळच आली नसती.डोंगरला-नवरगाव रस्त्यावर असलेला रेतीचा अवैध साठा महसूल प्रशासनाने रस्त्याशेजारी पसरविला आहे. गावात व परिसरातील रेतीच्या अवैध साठ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. ही कारवाई करताना भेदभाव करू नये.-देवचंद ठाकरे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तुमसर.