लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ढोरवाडा नदी पात्रातुन रेतीचे नियमबाह्यपणे सर्रास उत्खनन सुरु आहे. सदर रेती तुमसर-गोंदिया मार्गावर माडगी शिवारात साठा केली जाते. तिथून जेसीबीने राजरोसपणे ट्रकमध्ये भरली जाते. रेतीचा गोरखधंदा मागील अनेक दिवसापासून सुरु आहे. येथून हाकेच्या अंतरावर तलाठी कार्यालय आहे. महसुल प्रशासनाच्या दुर्लक्षाला कोणते कारण आहे, हा मुख्यप्रश्न उपस्थित होत आहे.तुमसर तालुक्यात ढोरवाडा हे गाव वैनगंगेच्या काठावर वसले आहे. तुमसर गोंदिया राज्यमार्गापासून अवघ्या चार किमी अंतरावर गाव असून रेती तस्करांचे ते सुरक्षित स्थळ मानले जाते. नदी काठापर्यंत जाण्याकरिता रस्ता, राज्य मार्ग जवळ व तालुक्याचे शेवटचे टोक असे हे गाव आहे. विस्तीर्ण नदी पात्र असल्याने मोठा रेतीसाठा येथे उपलब्ध आहे. प्रशासनाचेही येथे सहसा लक्ष जात नाही. नागपूर, भंडारा, रामटेक व गोंदियाकडे येथून सहज जाता येते.रेती तस्कर ट्रॅक्टरने नदी पात्रातून रेतीचा उपसा करतात. त्यानंतर माडगी चौकात रस्त्याच्या शेजारील एका कॉम्प्लेक्स मागे रेतीचा साठा केला जातो. जेसीबीने रेती ट्रकमध्ये भरली जाते.ट्रक त्यानंतर रवाना होतो. नदीघाटाचा लिलाव नसतांना सर्रास राजरोसपणे रेतीचा उपसा सुरु आहे. रेती साठ्यापासुन माडगी (दे) तलावठी कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे, हे विशेष.तुमसर-गोंदिया राज्य मार्गाशेजारी रेती साठा केल्यानंतर त्याकडे महसुल प्रशासनाचे लक्ष जात नाही. यात नेमके कोणते कारण दडले आहे. याचा शोध घेण्याची गरज आहे. वैनगंगा नदी पात्रातील रेतीला प्रचंड मागणी असून पांढरी शुभ्र रेतीचा तिकाच काळा व्यवसाय येथे फोफावला आहे. येथील रेती तस्करीचे तार नागपूरात असल्याचे समजते.येथे अद्यापपावेतो कोणतीच कारवाई झाली नाही. बेरोजगार व्यवसायत नक्कीच गुंतले आहेत, परंतु रेतीचा खरा नफा मोठ्या कंत्राटदारांना येथे होत आहे.
रेती उपसा ढोरवाड्यातून; साठा माडगी शिवारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:50 IST
ढोरवाडा नदी पात्रातुन रेतीचे नियमबाह्यपणे सर्रास उत्खनन सुरु आहे. सदर रेती तुमसर-गोंदिया मार्गावर माडगी शिवारात साठा केली जाते. तिथून जेसीबीने राजरोसपणे ट्रकमध्ये भरली जाते. रेतीचा गोरखधंदा मागील अनेक दिवसापासून सुरु आहे. येथून हाकेच्या अंतरावर तलाठी कार्यालय आहे. महसुल प्रशासनाच्या दुर्लक्षाला कोणते कारण आहे, हा मुख्यप्रश्न उपस्थित होत आहे.
रेती उपसा ढोरवाड्यातून; साठा माडगी शिवारात
ठळक मुद्देरेतीचा सर्रास गोरखधंदा : जेसीबीने रेतीचा ट्रकमध्ये भराव, हाकेच्या अंतरावर आहे तलाठी कार्यालय