शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
6
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
7
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
8
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
9
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
10
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
11
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
12
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
13
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
14
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
15
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
16
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
17
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
18
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
19
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
20
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

लख्ख चंद्रप्रकाशात निसर्गानुभवासाठी अभयारण्य सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 5:00 AM

निसर्गानुभवात वन्यजीव विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाेबत वन्यप्राणी व निसर्गप्रेमी १६ मे राेजी रात्री सहभागी हाेत आहेत. नवेगाव-नागझीरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत निसर्गानुभव-२०२२ या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. वन्यप्राण्यांची प्रगणना करणे हे यामागील उद्देश आहे. बुद्ध पाैर्णिमेच्या रात्री अर्थात १६ मे राेजी हा निसर्ग अनुभवण्याचा उपक्रम आयाेजित केला आहे. चंद्राच्या लख्ख प्रकाशात निसर्ग व वन्यजीवांचे दर्शन जवळून घडणार आहे.

युवराज गाेमासेलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाैर्णिमेच्या रात्री लख्ख चंद्रप्रकाशात निसर्गानुभवासाठी काेका वन्यजीव अभयारण्य सज्ज झाले आहे. वन्य प्राण्यांची प्रगणना करण्यासाठी चार सहवनक्षेत्रात १७ मचाणी उभारल्या असून १७ कर्मचारी आणि ३४ प्रगणकांच्या माध्यमातून प्राण्यांची नाेंद घेतली जाणार आहे. या निसर्गानुभवात वन्यजीव विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाेबत वन्यप्राणी व निसर्गप्रेमी १६ मे राेजी रात्री सहभागी हाेत आहेत.नवेगाव-नागझीरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत निसर्गानुभव-२०२२ या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. वन्यप्राण्यांची प्रगणना करणे हे यामागील उद्देश आहे. बुद्ध पाैर्णिमेच्या रात्री अर्थात १६ मे राेजी हा निसर्ग अनुभवण्याचा उपक्रम आयाेजित केला आहे. चंद्राच्या लख्ख प्रकाशात निसर्ग व वन्यजीवांचे दर्शन जवळून घडणार आहे.काेका वन्यजीव अभयारण्यात डाेडमाझरी, चंद्रपूर, उसगाव, काेका हे चार सहवनक्षेत्र आहे. या सहवनक्षेत्रात १७ मचानी तयार करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज आमंत्रित करून ३४ प्रगणकांची नियुक्त करण्यात आली आहे, तर १७ कर्मचारी त्यांच्या मदतीला राहणार आहेत. भंडारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले काेका वन्यजीव अभयारण्य निसर्गप्रेमींना भुरळ घालत असते.

असे आहे काेका वन्यजीव अभयारण्य- भंडारा तालुक्यात ११० चाैरस किमी क्षेत्रात काेका वन्यजीव अभयारण्य आहे. १८ जुलै २०१३ रोजी या अभयारण्याची निर्मिती झाली. अभयारण्यात २०० प्रजातींचे पक्षी, ५० प्रजातींची फुलपाखरे, हजाराे वृक्ष आहेत. यासाेबतच वाघ, बिबट, चांदी अस्वल, रानकुत्रे, काळी अस्वल, चितळ, रानगवे, सांभाळ, रानकाेंबडे, साळिंदर आदी प्राणी आहेत. बेहडा, हिरडा, बेल, रक्तपापळी, अमरवेल अशा वनऔषधी वृक्षांची भरमार आहे. घनदाट जंगल डाेंगरमाळा आणि खळखळणारे निर्झर पर्यटकांना भुरळ घालतात.

व्याघ्र दर्शनाने  पर्यटकांत वाढ- काेका वन्यजीव अभयारण्यात २९ एप्रिल राेजी एका तलावाच्या तिरावर तीन बछड्यांसह वाघिणीचे दर्शन झाले. वन्यप्रेमींसाठी ही पर्वणी ठरली. त्यानंतर पर्यटकांचा ओघ वाढत गेला. सुमारे ५०० पर्यटकांनी व्याघ्र दर्शनानंतर सफारीचा आनंद लुटला. वन्यजीव विभागाच्या वतीने पर्यटनासाठी विविध सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत.

 नागझिरा व्याघ्र प्रकल्पात ६७ मचान

साकोली : नागझिरा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत निसर्गानुभव उपक्रमासाठी जुना नागझिरा २८, नवीन पिटेझरी २८, नवीन उमरझरी ११ असे ६७ मचान उभारले आहे. १६३ निसर्गप्रेमी या अभियानात सहभागी होत आहे. कोरोनामुळे दोन वर्षे सफारी पासून वंचित असलेल्या निसर्गप्रेमींना या अभियानामुळे सफारीचा आनंद घेता येणार आहे. नागझिरा अभयारण्य प्रशासनाच्यावतीने या निसर्गानुभव उपक्रमाचे आयाेजन केले असून यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.

 

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्यNagzira Tiger Projectनागझिरा व्याघ्र प्रकल्प