शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सालेबर्डीच्या पुनर्वसन प्रस्तावाला मंजुरी

By admin | Updated: April 10, 2017 00:34 IST

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पात बाधीत असलेल्या सालेबर्डी पांधी या गावचे पुनर्वसनाचे प्रकरण गेल्या दीड वर्षापाूसन

मार्ग मोकळा : ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा प्रयत्नाला यशजवाहरनगर : भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पात बाधीत असलेल्या सालेबर्डी पांधी या गावचे पुनर्वसनाचे प्रकरण गेल्या दीड वर्षापाूसन महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तपत्रामध्ये नकारार्थी वृत्त प्रकाशित झाल्यामुळे गेल्या दिड वर्षापासून मंत्रालयात हे प्रकरण प्रलंबित होते. अखेर सदर गावच्या पुनर्वसन प्रस्तावाला व पुनर्वसन करण्यास शासनाची कोणतेही नाहरकत नसून मंत्री मंडळाची मंजूर देण्यात आली.सालेबर्डी हे गाव गोसेखुर्द प्रकल्पात संपादित करण्यात आले. सदर गावाला मोबदला व पॅकेज त्याचप्रमाणे शेतीचा मोबदला व पॅकेज देण्यात आले असे २३ कोटी या गावावर खर्च करण्यात आले व पुनर्वसनाची प्रक्रिया पुढे सुरु असताना काही कारणास्तव सदर गावाची पुर्नवसन प्रक्रिया थांबविण्यात आली. त्यावर शासनाने चौकशी समिती नेमुन चौकशीचा अहवाल जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना अहवाल मागविण्यात आले व हे प्रकरण मंत्रालयात गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित होते. सदर गावाचे पुनर्वसन प्रकरण मंत्रालयात संथगतीने होते मात्र सालेबर्डीच्या गावच्या लोकप्रतिनिधी सरपंच, उपसरपंच व त्यांच्या सदस्यांनी मुंबई येथील मंत्रालयात क्षेत्राचे आमदार अवसरे यांच्या नेतृवात वेळोवेळी पुनर्वसन मंत्रालयात प्रलंबित असलेले प्रकरण मार्गी लावण्यात आले. गावाच्या पुनर्वसन प्रस्थावाला मंत्रालयातून लवकरात लवकर मंजूरी मिळावी म्हणून नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात दरम्यान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणावर चर्चा करण्यात आली होती. मंत्रीमंडळाच्या बैठकीत अखेर या गावाच्या पुनर्वसन प्रस्तावास व पुनर्वसन करण्यास हरकत नसल्याचे शिक्कामोर्तब झाल्यामुळे सदर गावाच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे सालेबर्डी वासीयांना भुखंड पट्टे त्यांना मिळणार यामुळे गावकऱ्यात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. (वार्ताहर)