शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साकोली उपजिल्हा रुग्णालय 'सलाईनवर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 21:51 IST

उपजिल्हा रुग्णालयाच्या जीर्ण इमारतीमध्ये रुग्णांची तपासणी व उपचार दिला जातो. केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जीर्ण अवस्थेत असलेले निवासस्थान, अधिकारी व कर्मचारी बाहेर राहत असल्यामुळे अतिआवश्यक सेवा रुग्णांना वेळेवर मिळत नाही.

ठळक मुद्देसुविधांचा अभाव : जीर्ण इमारतीमध्ये रुग्णांची तपासणी व उपचार, अधिकारी-कर्मचाऱ्यांची वाणवा

शिवशंकर बावनकुळे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली: उपजिल्हा रुग्णालयाच्या जीर्ण इमारतीमध्ये रुग्णांची तपासणी व उपचार दिला जातो. केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जीर्ण अवस्थेत असलेले निवासस्थान, अधिकारी व कर्मचारी बाहेर राहत असल्यामुळे अतिआवश्यक सेवा रुग्णांना वेळेवर मिळत नाही.उपजिल्हा रुग्णालय राष्ट्रीय महामार्गावर अत्यंत महत्वाचे रुग्णालय असून सर्वच स्तरावर दुर्लक्षित रुग्णालय म्हणून गणल्या जातो आहे. उपजिल्हा रुग्णालयाची जुनी इमारत सन १९८१ ला तयार करण्यात आली. यात जुन्या इमारतीमध्ये बाह्य रुग्ण तपासणी, एक्सरे, रक्त तपासणी, औषध वाटप विविध तपासण्या याच इमारतीमध्ये केल्या जाते. पावसाळ्यात जागोजागी अनेक कक्ष पाण्यावरून जातात. त्यावेळेस रुग्ण व वैद्यकीय अधिकारी यांना त्रास सहन करुनच रुग्णांची तपासणी केली जाते. मागील अनेक वर्षापासून देखभाल दुरुस्ती करण्यात आली नाही.उपजिल्हा रुग्णालय १०० खाटा करिता नियोजित असून सुद्धा विकासात्मक मानसिकतेचा अभाव असल्यामुळे हे रुग्णालय १०० खाटांचे होऊ शकले नााही. ही वस्तूस्थिती आहे. वैद्यकीय अधिकाºयांची कमतरता ही समस्या मागील अनेक वर्षापासून कायम आहे. येथे वैद्यकीय अधीक्षकांची पदे १५ वर्षापासून रिक्त आहे. येथे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे नेहमीच नागपूर, भंडारा रेफर केल्या जाते.२१ फेब्रुवारी १९८१ ला कुटीर रुग्णालयाची इमारत तयार करण्यात आली. या इमारतीच्या सर्वच कक्षामध्ये भेगा पडल्या आहेत. स्लॅबच्या सळाखी सर्वच कक्षामध्ये दिसत आहे. या इमारतीला सुमारे ४७ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. काही दिवसापूर्वी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी एन.एस. लंजे व टी.सी. देशपांडे यांच्या कक्षात वरून स्लॅबचे खिपले पडल्यामुळे किरकोळ जखमी झाले होते. कर्मचारी व उपधिकारी यांना केव्हाही स्लॅब कोसळण्याच्या भीतीमध्ये कार्य करावे लागते.अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या इमारतीमध्ये कार्यरत सर्व विभाग व कर्मचाºयांची इतरत्र व्यवस्था करण्यात येईल. या इमारतीला पाडण्याचे आदेश आहेत. निधी प्राप्त होताच इमारत पाडण्यात येईल.-डॉ.चंद्रशेखर मेश्राम, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा कार्यालय, साकोली.