शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

साकोली पंचायत समितीचे वाहन भंगारावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 21:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : पंचायत समिती साकोलीच्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांसाठी असलेली शासकीय वाहन सध्या कचऱ्याच्या ...

ठळक मुद्देजीप ठेवली कचऱ्यात : जाळण्याचाही प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : पंचायत समिती साकोलीच्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांसाठी असलेली शासकीय वाहन सध्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ठेवली आहे. मागील आठवड्यात या वाहनाला कचऱ्यासोबत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुदैवाने हा प्रसंग टळला असला तरी हे वाहन तिथेच पडले आहे. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.पूर्वी पोलीस स्टेशनसमोर असलेल्या जुन्या पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातच सर्व विभाग होती.मात्र महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात या पंचायत समितीच्या विभागाचे इतरत्र विभागणी करण्यात आली. यावेळी महिला व बालविकास प्रकल्प कार्यालय हे एम बी पटेल महाविद्यालयजवळ भाड्याच्या घरात आणण्यात आले. या विभागासाठी स्वतंत्र एक गाडी देण्यात आली.दिवसेंदिवस ही गाडी खराब होत आली. तीला वारंवार दुरुस्त करण्यात आले मात्र कालांतराने ही जीप दुरुस्तीच्याही पलीकडे गेली. त्यामुळे ही जीप कार्यालयासमोर ठेवण्यात आली होती. मात्र काही वर्षानंतर या जीपला तिथुन ढकलून समोरच्या कचऱ्यात नेऊन फेकण्यात आली. तेव्हापासून ही कार कचºयाच्या ढिगाºयातच फेकली आहे.मागील आठवड्यात कचऱ्याबरोबर या जीपला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुदैवाने हा प्रसंग टळला. तरीही ही जीप त्याच ठिकाणी आहे. जुन्या पंचायत समिती आवारात एवढी जागा असतांनी हे वाहन तीथे न ठेवता बेवारस स्थीतीत हे वाहन कसे काय ठेवण्यात आले. हा संशोधनाचा विषय आहे. एकीकडे शासन पैसे वाचविण्यासाठी विविध उपाय शोधते तर दुसरीकडे शासकीय अधिकारी पैशाची अशी उधळपट्टी करतांना दिसतात.